क्लास-महाविद्यालयांचा छुपा करार, यंदाही ‘त्या’ महाविद्यालयांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:49 AM2018-07-09T01:49:57+5:302018-07-09T01:50:22+5:30

आयआयटी, जेईई आणि नीट... अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचा तसा उपयोगच नाही. त्यामुळे कशाला महाविद्यालयांमध्ये वेळ घालवायचा, म्हणून क्लासचालकांनी विद्यार्थ्यांना आकाशाची स्वप्ने दाखवायला सुरुवात केली आहे.

 The class-colleges hidden contracts, this year also crowded the 'colleges' | क्लास-महाविद्यालयांचा छुपा करार, यंदाही ‘त्या’ महाविद्यालयांमध्ये गर्दी

क्लास-महाविद्यालयांचा छुपा करार, यंदाही ‘त्या’ महाविद्यालयांमध्ये गर्दी

Next

पुणे - आयआयटी, जेईई आणि नीट... अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचा तसा उपयोगच नाही. त्यामुळे कशाला महाविद्यालयांमध्ये वेळ घालवायचा, म्हणून क्लासचालकांनी विद्यार्थ्यांना आकाशाची स्वप्ने दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक शाळा आणि महाविद्यालयांची मात्र चांदी झाली आहे. चुकूनही प्रवेश घेऊ नये अशा सुविधा आणि गुणवत्ता असणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना गुणवंतांची पसंती मिळाल्याचे चित्र अकरावी प्रवेशाच्या कटआॅफ गुणांच्या यादीतून पुढे आले आहे.
इयत्ता अकरावी प्रवेशाच्या कटआॅफ गुणांच्या यादीत यंदाही खासगी क्लासशी छुपा करार करणाºया काही महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची पसंती मिळाल्याचे दिसते. नामांकित महाविद्यालयांना मागे टाकून काही महाविद्यालयांनी क्लासच्या मदतीने विद्यार्थ्यांची गर्दी खेचण्यात यश मिळविले.
राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक हजेरी शक्कल लढविली असली, तरी या छुप्या करारांवर काहीही परिणाम झालेला नसल्याचेच यातून स्पष्ट होते. काही वर्षांपासून शहरातील काही खासगी क्लास व काही महाविद्यालयांमध्ये छुपा करार केला जात आहे. या करारानुसार संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना केवळ प्रात्यक्षिकांना उपस्थित राहण्याची मुभा दिली जाते. या विद्यार्थ्यांना वर्गात बसणे बंधनकारक नसते. त्यांची हजेरी महाविद्यालयांकडूनच लावली जाते. त्यामुळे विद्यार्थी केवळ क्लासमध्येच उपस्थिती लावतात. परिणामी, संबंधित महाविद्यालयांचे वर्ग ओस पडतात. प्रामुख्याने चांगले गुण मिळालेले विद्यार्थी नामांकित, दर्जेदार शिक्षण देणाºया महाविद्यालयांना पसंती देतात; पण अनेक विद्यार्थी क्लासला प्राधान्य देतात. क्लासच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांच्याकडून आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेद्वारे महाविद्यालयांची निवड केली जाते. आॅनलाईन प्रक्रियेत अर्ज कसा भरावा, पसंतीक्रम कसे टाकावेत, याची सर्व माहिती संबंधित क्लास व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना दिली जाते. मागील अनेक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना कधीही माहीत नसलेली महाविद्यालये अचानक हवीहवीशी वाटू लागले आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होत आहे.

प्रकाशझोतात नसलेली महाविद्यालये वाटू लागली विद्यार्थ्यांना हवीहवीशी

दहावीची परीक्षा झाल्यापासूनच पालकांना या क्लासचालकांचे फोन यायला सुरुवात झाली. त्यांच्याकडूनच कोणत्या शाळा-महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, हे विद्यार्थ्यांना सांगण्यात
आले.
दररोज महाविद्यालयात जाण्याची गरज नाही. सर्व अभ्यास क्लासमध्येच करून घेण्यात येईल. त्यामध्येही जास्त भर हा सीईटीवर दिला जाईल, असे सांगण्यात येते.

छुप्या करारामुळे मागील काही वर्षांत कधीही प्रकाशझोतात नसलेली महाविद्यालये विद्यार्थ्यांना अचानक हवीहवीशी वाटू लागली आहेत.

यंदाच्या पहिल्या फेरीच्या कटआॅफ यादीतही हे पाहायला मिळत आहेत. संबंधित महाविद्यालयांनी कटआॅफमध्ये नामांकित महाविद्यालयांनाही मागे टाकले आहे.

या करारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी विज्ञान शाखेसाठी बायोमेट्रिक हजेरीचा महाविद्यालयांकडे आग्रह केला आहे. त्यानुसार शिक्षण विभागानेही सर्व शिक्षणाधिकाºयांना याबाबत महाविद्यालयांना अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांची हजेरी पाहण्यासाठी सांगितले आहे. पण, यानंतरही या करारांवर काहीही परिणाम
झाल्याचे दिसत नाही. संबंधित महाविद्यालयांचे कटआॅफ पाहिल्यानंतर
हे करार यंदाही झाल्याचे दिसत असून त्यानुसार प्रवेशही सुरू झाले असल्याचे चित्र आहे.

Web Title:  The class-colleges hidden contracts, this year also crowded the 'colleges'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.