तिस-या फेरीसाठी ३७ हजार जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:32 AM2017-07-27T06:32:30+5:302017-07-27T06:32:35+5:30
इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसºया फेरीसाठी सुमारे ३७ हजार जागा उपलब्ध असून त्यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १४ हजार १९४ जागा आहे.
पिंपरी : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसºया फेरीसाठी सुमारे ३७ हजार जागा उपलब्ध असून त्यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १४ हजार १९४ जागा आहे. दरम्यान, दुसºया फेरीपर्यंत १५ महाविद्यालयांतील काही शाखांचे खुल्या वर्गाचे प्रवेश पुर्ण झाले आहेत. तिसºया फेरीसाठी या वर्गातील १३ हजार ६९१ जागा शिल्लक राहिल्या आहेत.
केंद्रीय प्रवेश समितीकडून बुधवारी तिसºया फेरीसाठी रिक्त जागांची आकडेवारी प्रसिध्द केली. या फेरीसाठी एकुण ३७ हजार १८३ जागा उपलब्ध आहेत.
पहिल्या फेरीमध्ये २४ हजार ६७२ तर दुसºया फेरीत १० हजार ५३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश अंतिम केला आहे. दुसºया फेरीप्रमाणेच विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्जामध्ये बदल करण्यासाठी तसेच अद्यापपर्यंत अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी बुधवारपासूनच सुरूवात झाली आहे. रिक्त जागांनुसार विद्यार्थ्यांना पसंती क्रम बदलता येणार आहेत.
समितीकडून प्रवर्ग व शाखानिहाय रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पसंती क्रम देता येणार आहेत. तिसºया फेरीसाठी विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १४ हजार १९४ जागा उपलब्ध असून त्याखालोखाल वाणिज्य शाखेच्या १३ हजार ९२४ जागा रिक्त आहेत.
दुसºया फेरीअखेरपर्यंत पुणे व पिंपरी चिंचवडमधील १५ महाविद्यालयांतील विविध शाखा व माध्यमांचे खुल्या गटाचे प्रवेश पुर्ण झाले आहेत. तसेच इतर प्रवर्गाच्या रिक्त जागाही कमी राहिल्या आहेत. अनुदानित तुकड्यांसाठी प्रामुख्याने विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. या महाविद्यालयांपैकी नऊ महाविद्यालांतील वाणिज्य शाखेच्या खुल्या प्रवर्गातील जागा संपल्या आहेत.
तसेच कला शाखेचे मराठी माध्यमाचे प्रवेश पुर्ण झाल्याची माहिती समितीकडून देण्यात आली. या महाविद्यालयांतील प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यानंतरच जागा रिक्त होवू शकतील. सेंट उर्सुला कनिष्ठ महाविद्यालय अल्पसंख्याक असून सर्वच जागा दुसºया फेरीअखेर संपल्याची माहिती समितीच्या सचिव मिनाक्षी राऊत यांनी दिली.
खुल्या प्रवर्गातील प्रवेश संपलेली महाविद्यालये
१. फर्ग्युसन महाविद्यालय - कला (अनुदानित)
२. राजीव गांधी ई-लर्निंग स्कुल - विज्ञान (विनानुदानित)
३. सीईएस प्रेरणा विद्यालय - वाणिज्य (अनुदानित)
४. प्रतिभाताई पवार विद्यालय - कला (अनुदानित)
५. चंद्रकांत दांगट विद्यालय - कला (अनुदानित)