शास्त्रीय जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध
By admin | Published: November 12, 2015 02:20 AM2015-11-12T02:20:05+5:302015-11-12T02:20:05+5:30
दिपावली निमित्त चित्तरंजन वाटिका येथे आयोजित केलेल्या संगीत महोत्सवास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मीरा कि तोडी राग, जोहार मायबाप जोहार, शूर मी वंदिले
पुणे : दिपावली निमित्त चित्तरंजन वाटिका येथे आयोजित केलेल्या संगीत महोत्सवास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मीरा कि तोडी राग, जोहार मायबाप जोहार, शूर मी वंदिले, प्रिये पहा रात्रीचा समय या नाट्य आणि शास्त्रीय संगीताने तसेच गायक कैवल्यकुमार गुरव आणि आनंद भाटे यांच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. नवनिर्माण अभियान व हमराज मित्रमंडळातर्फे नगरसेवक राजू पवार यांनी संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवारी सकाळी सहा वाजता सुरु झालेल्या या संगीत महोत्सवात प्रारंभ मीरा की तोडी रागाने करण्यात आला. नाट्यसंगीताच्या सुरेल स्वराने त्यातही सप्तकातील तार रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली. सूत्रसंचालन रेणुका जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)