स्वच्छ भारत, राष्ट्रीय एकता दिनाला थंडा प्रतिसाद?
By Admin | Published: November 2, 2014 12:08 AM2014-11-02T00:08:48+5:302014-11-02T00:08:48+5:30
स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करून त्या संदर्भातील अहवाल पुणो विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
पुणो : स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करून त्या संदर्भातील अहवाल पुणो विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणो, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील केवळ बोटावर मोजता येतील एवढय़ाच अनुदानित महाविद्यालयांनी या बाबतचे अहवाल जमा केले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून या अभियानास प्रतिसाद मिळाला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणो शासनाच्या आदेशाला महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवल्याची माहितीसुद्धा यामुळे समोर आली आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशातील सर्व शैक्षणिक संस्थांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करून विविध कार्यक्रम आयोजित करणो बंधनकारक होते.
तसेच स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिवस या निमित्त राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल त्याच दिवशी वरिष्ठ कार्यालयास कळवणो अपेक्षित होते. मात्र, स्वच्छ भारत अभियानास सुरुवात होऊन तब्बल एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही केवळ 15 महाविद्यालयांनी यासंदर्भात राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर केला आहे. त्यामुळे या अभियानाचा सर्व क्षेत्रतून मोठा गवगवा केला जात असला, तरी प्रत्यक्षात महाविद्यालयांनी या अभियानात सहभाग घेतला नसल्याचे सहसंचालक कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालांच्या संख्येवरून दिसून येत आहे.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वतंत्रता चळवळीमध्ये व त्यानंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा तसेच जनतेला त्यांच्या कामगिरीतून प्रेरणा मिळावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस
साजरा करण्याचे आदेश केंद्र
शासनाने दिले होते. तसेच
त्यावरील अहवाल त्याच दिवशी
सादर करण्याचे आदेशही सहसंचालक कार्यालयाकडून दिले गेले होते,
परंतु आतार्पयत केवळ 7 महाविद्यालयांनीच यावरील अहवाल सादर केले आहेत.(प्रतिनिधी)
पुणो विभागीय उच्च शिक्षणासह संचालक कार्यालयांर्तगत 165 अनुदानित महाविद्यालये येतात. त्यातील केवळ 15 महाविद्यालयांनी स्वच्छ भारत अभियानांर्तगत राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल पाठविला आहे. तर 7 महाविद्यालयांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राबविलेल्या उपक्रमांची माहिती कळविली आहे. सर्व महाविद्यालयांनी अहवाल तात्काळ सादर करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
- डॉ.सुनील शेटे, उच्च शिक्षण सहसंचालक,पुणो विभाग.