समाधिस्थळांची स्वच्छता करून दिला आठवणींना उजाळा

By Admin | Published: November 11, 2015 01:36 AM2015-11-11T01:36:38+5:302015-11-11T01:36:38+5:30

भोर शहरातील मशालीचा माळ येथील गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या भोरचे राजे व राणी (पंतसचिव) यांच्या १४ समाधिस्थळांची व परिसराची स्वच्छता करून सुमारे दोनशे

Clean up the memorials, clean up the memorials | समाधिस्थळांची स्वच्छता करून दिला आठवणींना उजाळा

समाधिस्थळांची स्वच्छता करून दिला आठवणींना उजाळा

googlenewsNext

भोर : भोर शहरातील मशालीचा माळ येथील गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या भोरचे राजे व राणी (पंतसचिव) यांच्या १४ समाधिस्थळांची व परिसराची स्वच्छता करून सुमारे दोनशे वर्षांपूर्वीच्या संस्थानकालीन आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे. पुण्यातील अग्रगण्य असलेली दुर्गसंर्वधन संस्था शिवाजी ट्रेलर यांच्या मार्गदर्शनाखाली भोर हिस्ट्री क्लबच्या वतीने २३ कार्यकर्ते व राजा रघुनाथराव विद्यालयातील विद्यार्थी यांनी एकत्रित मिळून पंतसचिवांच्या समाधिस्थळांंची व परिसराची स्वच्छता अभियान राबून झाडाझुडपातून व गवतात झाकून गेलेल्या समाधिस्थळांची स्वच्छता केलेल्या परिसराला ‘नवसंजीवनी’ दिली.
या वेळी भोर एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विजय रावळ यांच्या हस्ते ऐतिहासिक स्वच्छता जतन सर्वधन मोहिमेचा शुभारंभ झाला. तर, पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई यांच्या हस्ते भोर हिस्ट्री क्लबचे उद्घाटन झाले.या वेळी शिवाजी ट्रेलरचे संस्थापक मिलिंद क्षीरसागर, विनायक खोत, मुकुंद उत्पात, मनीष पुराणिक, हेमंत बावीकर, सुनील कदम, हिस्ट्री क्लबचे समन्वयक विनित वाघ, महेश पवार, अमित भालेकर, नारायण वाघ, विक्रम शिंदे, अनुश्री फाटक, श्रद्धा निमकर, उन्मनी महाजन, सुजित नवले, प्रतिक तेली, शुभम वेदपाठक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Clean up the memorials, clean up the memorials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.