स्वच्छ सर्वेक्षणात सासवड पालिका प्रथम यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:29 AM2017-12-30T01:29:55+5:302017-12-30T01:29:59+5:30
सासवड : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानात सासवड नगरपालिका देशात अव्वल क्रमांक मिळवेल, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
सासवड : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानात सासवड नगरपालिका देशात अव्वल क्रमांक मिळवेल, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. सासवड नगरपालिकेनेएका वर्षात घनकचºयाबाबत केलेल्या कार्याचे कौतुक त्यांनी केले. मुंबई येथे स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमात या अभियानांतर्गत सासवड नगरपालिकेनेघनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत तयार केलेल्या कंपोस्ट खतास महाराष्ट्र शासनाचा ‘हरित महा सिटी कंपोस्ट’ हा ब्रँड विक्रीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व मुख्याधिकारी विनोद जळक यांना प्रदान केला. याप्रसंगी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या.
राज्यातील २७ नगरपालिकांनी तयार केलेल्या कंपोस्ट खताच्या ब्रँडसाठी शासनाकडे प्रस्ताव दिले होते. त्यातील सासवडसह विटा, सावनेर व कमळेश्वर या नगरपालिकांना हरित महा सिटी कंपोस्ट हा ब्रँड मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सासवड नगरपालिकेने सासवड येथील डीच हाऊस आणि कुंभारवळण येथील घनकचरा प्रकल्पात कंपोस्ट खतनिर्मिती केली आहे. यासाठी पालिकेला विज्ञान आश्रम पाबळ यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती मुख्याधिकारी जळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी सत्ताधारी जनमत विकास आघाडीचे प्रमुख व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, उपनगराध्यक्ष विजय वढणे, आरोग्य समितीचे सभापती अजित जगताप, नगरसेवक संजय ग. जगताप, मनोहर जगताप, गणेश जगताप, दिनेश भिंताडे, यशवंत जगताप, नगरसेविका पुष्पा जगताप, सारिका हिवरकर, माया जगताप आदी उपस्थित होते.
>अधिकारी, नागरिकांशी सुसंवाद सुरू
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानांतर्गत आतापर्यंत पालिकेने स्वच्छता, हगणदरीमुक्त आणि कंपोस्ट खताचा ब्रँड या तीन टप्प्यांत यश मिळविले आहे. ४ जानेवारीपासून प्रत्यक्षात सुरू होणाºया स्वच्छ सर्वेक्षणातही पालिका लोकसहभागातून यश संपादन करेल. त्यासाठी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा सुसंवाद होत आहे, असेही मुख्याधिकाºयांनी सांगितले.