टेम्पोच्या धडकेत क्लीनर ठार
By Admin | Published: January 11, 2017 02:58 AM2017-01-11T02:58:57+5:302017-01-11T02:58:57+5:30
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त लक्झरी बसला पाठीमागून टेम्पोची जोरात ठोकर बसून झालेल्या अपघातात टेम्पोचा क्लीनर गंभीर जखमी झाल्याने ठार झाला.
तळेगाव दाभाडे : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त लक्झरी बसला पाठीमागून टेम्पोची जोरात ठोकर बसून झालेल्या अपघातात टेम्पोचा क्लीनर गंभीर जखमी झाल्याने ठार झाला.
हा अपघात पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्याजवळील ओझर्डे (ता. मावळ) गावच्या हद्दीत किलोमीटर क्र. ७७/५०० नजीक मंगळवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास झाला. प्रभाकर सुरो सिंग ( वय २४, रा. चराय्या, ता. चरकापत्थर, जि. जमोई , बिहार) असे अपघातातील ठार झालेल्या क्लीनरचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहूून पुण्याच्या दिशेने येणारी लक्झरी बस (क्र. एमएच ०४ एसके ९८७६) टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचदिशेने पाठीमागून येणाऱ्या टेम्पो (क्र. डी.डी. ०३ एल. ९२६०)चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो लक्झरी बसवर जोरात आदळला. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात टेम्पोचा पुढील भाग चेपला गेल्याने क्लीनर प्रभाकर सिंग हा गंभीर जखमी झाल्याने ठार झाला. तर टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी.बी. बाजगिरे करीत आहे. (वार्ताहर)