स्वच्छतागृहे मशिनद्वारे होणार स्वच्छ

By admin | Published: March 30, 2015 05:37 AM2015-03-30T05:37:02+5:302015-03-30T05:37:02+5:30

सार्वजनिक स्वच्छतागृहे म्हटलं की दुर्गंधी, अस्वच्छता, उग्र वास असं तयार झालेलं समीकरण बदलण्याचा निश्चय पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला अ

Cleaners will be cleaned by the machine | स्वच्छतागृहे मशिनद्वारे होणार स्वच्छ

स्वच्छतागृहे मशिनद्वारे होणार स्वच्छ

Next

पुणे : सार्वजनिक स्वच्छतागृहे म्हटलं की दुर्गंधी, अस्वच्छता, उग्र वास असं तयार झालेलं समीकरण बदलण्याचा निश्चय पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला असून, शहरातील ८०० सार्वजनिक स्वच्छतागृहांची अत्याधुनिक जेटिंग मशिनच्या साह्याने स्वच्छता करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याकरिता शहरातील
१५ क्षेत्रीय कार्यालयांकरिता १५
जेटिंग मशिनच्या चासीज खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
स्वच्छतागृहांची दुरवस्था, कमी संख्या, महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध नसणे असे प्रश्न विविध संस्था, संघटनांकडून सातत्याने उपस्थित केले जातात. किमान आहेत ती स्वच्छतागृहे नीटनेटकी असावीत, त्याचा वापर करण्यास लोक धजावेत याकरिता त्यांच्या स्वच्छतागृहांकडे विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे. सध्या महापालिकेच्या सेवकांमार्फत सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जाते. प्रचंड घाण होणाऱ्या स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्याचे अत्यंत अवघड काम सेवकांना दररोज पार पाडावे लागते. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्याकडून व्यवस्थितपणे त्यांची स्वच्छता राखली जात नसे. त्यामुळे अत्याधुनिक मशिनच्या साह्याने ती स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्पोरेट आॅफिसेसमध्ये खासगी ठेकेदारांना स्वच्छतेचे कंत्राट दिले जाते. त्यांचा एक माणून दर ४ तासाला स्वच्छतागृहाची स्वच्छता करतो. त्यामुळे ती नेहमी चकाचक दिसून येतात. याउउलट सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Cleaners will be cleaned by the machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.