उपहारगृहांमधील भटारखान्याची स्वच्छता '' रामभरोसे''

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 07:00 AM2019-06-16T07:00:00+5:302019-06-16T07:00:04+5:30

पुणेकरांनो बाहेर खायला जाताय सावधान..!

Cleaness of kitchen in danger zone at the canteen | उपहारगृहांमधील भटारखान्याची स्वच्छता '' रामभरोसे''

उपहारगृहांमधील भटारखान्याची स्वच्छता '' रामभरोसे''

Next
ठळक मुद्देउपहारगृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करु नकासध्या पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर उपहारगृह चालकांनी स्वच्छतेकडे लक्ष देणे जरुरीचे

पुणे : शहरातील उपहारगृहांमध्ये मिळणारे अन्नपदार्थआरोग्याच्या दृष्टीने कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून पुढे आला आहे. परंपरा, दर्जा, चव यासारख्या गोष्टींचा जाहिरातीकरिता उपयोग करुन प्रत्यक्षात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचे काम उपहारगृहांमधील अस्वच्छतेमुळे उजेडात आले आहे. एकीकडे सुसज्ज, प्रशस्त आणि वातानुकुलित '' फिल '' देणाऱ्या उपहारगृहांमधील भटारखान्याची स्वच्छता नियमितपणे होते का?  हा आता चर्चेचा विषय ठरत आहे.
  सध्या पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर उपहारगृह चालकांनी स्वच्छतेकडे लक्ष देणे अधिक जरुरीचे आहे. असे असताना अनेक उपहारगृहांमधील भटारखाने अतिशय अस्वच्छ असल्याचे दिसून आले आहे. भटारखान्यातील धुराने कळकटलेल्या भिंती, जागोजागी फिरणारी झुरळे, विखुरलेला भाजीपाला, ज्या भांड्यांतून ग्राहकांना अन्नपदार्थ खाण्याकरिता दिले जातात त्यावर त्या भांड्यांना पडलेले डाग, स्वयंपाक घराच्या काळवंडलेल्या फरशा, त्या स्वयंपाक घराला आलेला कुबटपणा, पुरेशी हवा येण्याकरिता देखील जागा नसणे अशी परिस्थिती शहरांतील काही उपहारगृहांची आहे. सुट्टीच्या दिवशी बाहेर खायला जाणा-या हौशी पुणेकरांची संख्या मोठी आहे. विशेषत: दर शनिवारी, रविवारी या सुट्टीच्या दिवशी शहरातील अनेक उपहारगृहांमध्ये गर्दी पाहवयास मिळते.  ग्राहकांकरिता बनविण्यात येणा-या पदाथार्ची योग्य काळजी घेतली जाते का, तसेच उपहारगृहांत काम करणारे कर्मचारी स्वच्छता पाळतात का, जे पदार्थ वापरले जातात त्यांची मुदत संपलेली नाही ना? यासा-या गोष्टींबाबत ग्राहकाने जागरुक राहणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलटी आहे.  पुरेशा स्वच्छतेचा अभाव, अन्नाचे पॅकेजिंग योग्य पध्दतीने न करणे आणि अन्न सुरक्षितपणे वितरीत न करणे असेही अनेकदा ग्राहकांच्या पाहणीत आढळुन आले आहे.  आपल्या उपहारगृहांतील भटारखाना आणि काम क रणारे कर्मचारी याबाबत पुरेसे गांभीर्य उपहारगृह चालकच बाळगत नसल्याने त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे. 
  पुण्यासारख्या मोठ्या शहरांत मोठ्या संख्येने उपहारगृहे तयार झाली आहेत. उपनगरांमध्ये देखील त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. वाढते शहरीकरण, नागरिकरण लक्षात घेता नागरिकांच्या सोयीकरिता सगळीकडे उपहारगृहांची उभारणी होताना दिसते. अशावेळी त्यांना सरसक ट परवाने न देता त्यांची वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे आहे.  अनेकदा काही ठिकाणी मोठमोठे उपहारगृहांचे मालक प्रशासनाशी वाद घालताना दिसतात. वषार्नुवर्षे काम करीत असल्याचा अनुभव आणि दर्जा याबद्द्ल शेखी मिरवतात. परंतु स्वच्छतेच्या बाबत तितकी काळजी घेण्याविषयी त्यांची भूमिका आग्रही नसल्याचे ग्राहक सांगतात.  

* एकदा भटारखाना पाहण्यास काय हरकत आहे?
वरवर पंचतारांकित आणि सर्व सोयीनी युक्त असणा-या उपहारगृहात गेल्यानंतर ग्राहक तिथल्या वातावरणाने सुखावतो. हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात त्या उपहारगृहांतील अन्नपदार्थ ज्याठिकाणी तयार केले जातात अशा भटारखान्यात सर्वसामान्य ग्राहकांना प्रवेश नाकारला जातो. याबद्द्ल हॉटेलचालकाला विचारले असता त्याच्याकडून तितकेसे समाधानकारक उत्तर मिळत नाही. सध्या शहरातील काही मोठ्या व प्रसिध्द अशा उपहारगृहांमध्ये गेले असता त्यांच्या भटारखान्यात प्रवेश करण्यास मनाई अशा आशयाचा मजकुर लिहीलेला पाहवयास मिळतो. यासगळ्या परिस्थितीवर ग्राहकाने भटारखाना पाहण्याची इच्छा व्यक्त केली असता त्याला तो पाहण्याची परवानगी नाकारली जाते. त्यामुळे एकदा का होईना उपहारगृहातील भटारखाना पाहु द्यावा. अशी मागणी आता ग्राहकांकडून होत आहे. 

* तक्रार थेट सोशलमाध्यमांव्दारे 
एखाद्या उपहारगृहात जेवण करण्याकरिता गेले असताना तेथील खाद्यपदार्थात काही आढळुन आल्यास आता त्याची माहिती थेट सोशल माध्यमांतून शेयर करण्याचा नवीन टेÑंड दिसून येत आहे. यात व्हीडीओ, फोटो एकमेकांना शेयर करुन संबंधित उपहारृगृहाविषयी तक्रार ग्राहक मांडत आहेत. विशेष म्हणजे याच्या आधारावर प्रशासकीय स्तरातून घटनेची द्खल घेतली जाते. मागील काही दिवसांपूर्वी शहरातील एका नामांकित बियार्णीच्या मिळणा-या उपहारगृहात अळी आढळली होती. यावर तक्रारदाराने सोशल माध्यमांतून घटनेची माहिती दिली होती. याची नागरिकांनी गांभार्यार्ने नोंद तर घेतलीच याबरोबरच प्रशासनाकडून तातडीने कारवाईची पावले उचलण्यात आली. 
    

Web Title: Cleaness of kitchen in danger zone at the canteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.