महिला सदस्यांकडून भीमा नदीची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:00+5:302021-09-24T04:13:00+5:30
कोरेगाव भीमा : गणेशाबरोबर धरतीची केली सेवा --- कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे अनंत चतुर्दशीला ...
कोरेगाव भीमा : गणेशाबरोबर धरतीची केली सेवा
---
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे अनंत चतुर्दशीला कोरेगाव भीमा ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांनी नदी पात्रातील निर्माल्य पाण्यातून बाहेर काढत नदी स्वच्छ केली. श्री गणेशाची अनोखी पर्यावरणपूरक सेवा करत भीमा नदीपात्र स्वच्छ राखण्यासाठी अनोखा श्रमदान यज्ञ करण्यासाठी महिला सदस्यांनी काम केले.
कोरेगाव भीमा येथील भीमा नदीच्या पात्रात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येत असते. भीमा नदीच्या पवित्र पाण्यामध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी कोरेगाव भीमा, सणसवाडी, पेरणे फाटा, लोणीकंद , व मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या भागातून नागरिक येत असतात. गणेश भक्तांनी निर्माल्य नदीपात्रात तसेच नदीच्या परिसरात टाकून दिले होते यामध्ये हार, फळे, प्रसाद, केळीची खुंट आदी निर्माल्य मोठ्या प्रमाणात दिसत होते. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छता दिसत होती. भीमा नदी पात्र अस्वच्छ व परिसरात निर्माल्य आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात पडलेले असल्याने कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित महिला सदस्यांनी कोरेगाव भीमा स्मार्ट व स्वच्छ करण्याच्या हेतूने नदी पात्र स्वच्छ करत नागरिकांनी यापुढे आपली नदी स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते . ग्रामपंचायतच्या वतीने नदी पात्रात गणेश भक्तांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी लाईटसह पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवत कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सतर्कता बाळगण्यात आली होती.
नदी पात्र स्वच्छ करत उघड्यावर पडलेल्या गणेशमूर्ती पुन्हा नदीच्या प्रवाहात सोडण्यासाठी ग्रामपंचायत उपसरपंच शैला फडतरे,सदस्या मनीषा संपत गव्हाणे, अर्चना सुपेकर, सविता घावटे, ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले, संपत गव्हाणे, शीतल गायकवाड, हर्षदा सुपेकर, संगीता भोकरे, पूनम पाटील, प्रिया सुपेकर, श्रुती गव्हाणे, विशाल गव्हाणे, निखिल सुपेकर, स्वप्नील भोकरे, तिरसिंग नानगुडे, बाबू भोकरे आदींनी काम केले. विसर्जनाच्या दिवशी नदी पात्रात गर्दी टाळण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, विकास मोरे, श्रीमंत होनमाणे, अमोल दांडगे, एस. पवार, भास्कर बुधवंत, गणेश भंडारे आदींनी मोलाची भूमिका पार पाडली.
--
फोटो क्रमांक - २३कोरेगाव भीमा नदी स्वच्छता
फोटो : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भीमा नदीचे पात्र स्वच्छ करताना महिला सदस्या.
230921\177-img-20210923-wa0016.jpg
फोटो : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भीमा नदीचे पात्र स्वच्छ करताना महिला सदस्या