खरपुडी खुर्द येथे स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:01+5:302021-08-20T04:14:01+5:30
हगणदरीमुक्त अधिकबाबतचे निकष गावातील सर्व कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे शौचालयाच्या सुविधा, गावात सार्वजनिक शौचालय, ...
हगणदरीमुक्त अधिकबाबतचे निकष गावातील सर्व कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे शौचालयाच्या सुविधा, गावात सार्वजनिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन शाश्वत स्वच्छतेच्या अनुषंगाने माहिती शिक्षण व संवादाचे किमान ५ संदेश गावात दर्शनी ठिकाणी लावलेले असावेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून खरपुडी खुर्द (ता. खेड) येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रभात फेरी काढून गावातील नागरिकांना घनकचरा व सांडपाणी रस्त्यावर टाकू नये तसेच प्लास्टिकचा वापर टाळणे याबाबत सूचना करण्यात आल्या. यासंबंधी खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सोमनाथ कारंडे, पाणी व स्वच्छता कक्षाचे जि.प. समन्वयक विक्रम शिंदे व पाणी व स्वच्छता विभागामार्फत मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामसेवक दीपाली भोर, सरपंच हिरामण मलघे, उपसरपंच पूनम गाडे, बाजार समितीचे माजी सभापती दशरथ गाडे, निवृत्ती गाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गाडे, चंद्रप्रभा काळे, नंदा गाडे, कमल गाडे, रवींद्र खंडागळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुषमा गाडे मुख्याध्यापक नंदा चासकर, सुभाष मुळुक, अंगणवाडी सेविका सुमन गाडे, मदतनीस विमल गाडे, आशा सेविका साधना गाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.