कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर स्वच्छता मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:06+5:302021-01-02T04:10:06+5:30
या पालखी तळावर रात्री तळीराम बसत असून तिथे मद्याच्या बाटल्या टाकत असतात.तर या परिसरातील काही बेशिस्त नागरिक कचरा टाकत ...
या पालखी तळावर रात्री तळीराम बसत असून तिथे मद्याच्या बाटल्या टाकत असतात.तर या परिसरातील काही बेशिस्त नागरिक कचरा टाकत असल्याने पालखी तळावर घाणीचे साम्राज्य पसरले होते.वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील येथील कचरा काढण्यात आला. परंतु तरीही तळीराम व बेशिस्त नागरिक कचरा टाकत असल्याने इतर नागरिकांना याचा नाहक त्रास होत होता. यामुळे लोणी स्टेशन येथील जय हिंद ग्रुपच्या वीस ते पंचवीस युवकांनी प्रत्येक रविवारी मिळून येथे साफसफाई मोहीम सुरू केली. वर्षातून एकदा जगतगुरु तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे मुक्कामी असते. त्यावेळी पालखी सोहळ्यातील वारकरी या पालखी तळावर मुक्कामास असतात त्यावेळी प्रशासनाकडून साफसफाई केली जाते. तसेच या ठिकाणी विविध वृक्षांचे रोपन केल्यामुळे या जागेचे नंदनवन या तरुणांनी केल्यामुळे परिसरात या तरुणांचे मोठे कौतुक होत असून अशाच पद्धतीने इतर गावातील मुलांनी या होतकरू तरुणांचा आदर्श घेऊन वृक्षारोपण करून व गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवून गावाचा व पर्यावरणाचा विकास करावा असे आवाहन जय हिंद ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे.
--
फोटो ०१ कदमवाकवस्ती पालखी तळ सफाई
फोटो ओळ
साफसफाई पूर्वीचा पालखी तळाची अवस्था व सध्याची परिस्थिती