सफाई कर्मचारीच जाळतात कचरा

By admin | Published: April 29, 2016 01:16 AM2016-04-29T01:16:56+5:302016-04-29T01:16:56+5:30

शहरात अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना नागरिक वाढत्या प्रदूषणाला हातभार लावत आहेत.

Cleaning staff burns garbage | सफाई कर्मचारीच जाळतात कचरा

सफाई कर्मचारीच जाळतात कचरा

Next

मुंढवा : शहरात अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना नागरिक वाढत्या प्रदूषणाला हातभार लावत आहेत. मुंढवा येथील उड्डाणपुलाजवळ कचरा जागेवरच जाळण्यात येत आहे. तसेच नदीपात्राजवळील रस्त्यावर, बधेवस्ती येथील मुख्य रस्त्यावर महापालिकेचे कर्मचारी कचरा जाळत असल्यामुळे सकाळपासूनच धुराचे लोट पाहावयास मिळत आहेत. मुंढवा गावठाण, पिंगळेवस्ती, हडपसर रेल्वे स्टेशन परिसर, ताडीगुत्ता, बधेवस्ती या परिसरात कचरा जाळण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग वेळेवर उचलण्यात येत नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत काही नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(वार्ताहर)
>परिसरात धुराचे लोट
महापालिकेचे कर्मचारी सकाळी सर्व रस्ते झाडतात. झाडल्यानंतर जमा झालेला कचरा मात्र त्याच ठिकाणी जाळला जातो. कचरा जाळल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरत असून तासन्तास जळत राहिल्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या तसेच कामावर जाणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Cleaning staff burns garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.