मिनी रोबोकडून ब्रिटिशकालीन पर्जन्य वाहिन्यांची सफाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 04:13 AM2018-12-19T04:13:49+5:302018-12-19T04:14:12+5:30

मुंबई महापालिकेचा निर्णय : दोन टप्प्यांमध्ये होणार काम

Cleanliness of British Robbery's British Rain Show | मिनी रोबोकडून ब्रिटिशकालीन पर्जन्य वाहिन्यांची सफाई

मिनी रोबोकडून ब्रिटिशकालीन पर्जन्य वाहिन्यांची सफाई

Next

मुंबई : विषारी वायूमुळे मॅनहोलमध्ये सक्शन पाइपद्वारे मुंबईतील ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांची आतापर्यंत सफाई होत असे. मात्र, पहिल्यांदाच मिनी रोबोच्या मदतीने या भूमिगत पर्जन्यजल वाहिन्यांची अंतर्गत सफाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यांमध्ये ही सफाई केली जाणार आहे.

शहरी भागात काही ठिकाणी कमानी पद्धतीचे बांधकाम असलेल्या ब्रिटिशकालीन भूमिगत पर्जन्य जलवाहिन्या आहेत. यात विषारी वायू असण्याची शक्यता असल्याने, या वाहिन्यांच्या मॅनहोलमध्ये सक्शन पाइप टाकून साफसफाई केली जात असे. मात्र आता, वाहिन्यांच्या आत जाऊन साफसफाई करू शकेल, असे अत्याधुनिक स्वरूपाचे व रिमोट कंट्रोलवर चालणारे मिनी रोबो वापरण्यात येणार असल्याचे पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता श्रीकांत कावळे यांनी सांगितले.

पर्जन्य जलवाहिन्यांची व नालेसफाईची कामे एप्रिल व मे या पावसाळ्यापूर्वीच्या दोन महिन्यांत ६० टक्के कामे केली जातात. उर्वरित २० टक्के पावसाळ्याच्या चार महिन्यांत व २० टक्के कामे ही पावसाळ्यानंतरच्या सहा महिन्यांत केली जातात. खुल्या नाल्यांची आणि भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई केली जाते. पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई तीन मिनी रोबोच्या मदतीने नवीन वर्षापासून होणार आहे.

या ठिकाणांची प्राधान्याने सफाई
पावसाळापूर्व साफसफाईच्या प्राध्यान्यक्रम १ अंतर्गत समावेश असलेल्या भूमिगत वाहिन्यांमध्ये ए विभागातील शहीद भगतसिंह मार्ग, बी विभागातील मियां अहमद छोटाणी मार्ग, सी विभागातील किका रस्ता, डी विभागातील बॉडीगार्ड लेन, ई विभागातील जहांगीर बोमन बेहराम मार्ग (बेलासिस रोड), एफ दक्षिण विभागातील मडके बुवा चौक ते श्रावण यशवंत चौक, एफ उत्तर विभागातील षण्मुखानंद सभागृह ते बंगाली-पुरा, जी दक्षिण विभागातील फीतवाला लेन व सेनापती बापट मार्गाच्या जंक्शनपासून मडूरकर जंक्शनपर्यंत आणि जी उत्तर विभागातील महात्मा गांधी मार्ग या रस्त्यांच्या खाली असणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांचा समावेश आहे.

साफसफाई केल्यानंतर गाळाची जबाबदारी ठेकेदारावर
मिनी रोबोद्वारे साफसफाई केल्यानंतर टँकरमध्ये जमा झालेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असणार आहे, तसेच ठेकेदाराच्या सर्व वाहनांची स्थिती व वापर याबाबतची माहिती पालिकेकडे तत्काळ व नियमित स्वरूपात प्राप्त व्हावी, याकरिता संबंधित सर्व वाहनांमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग मशिन बसविणे बंधनकारक केले आहे.
मिनी रोबो या अत्याधुनिक व रिमोट कंट्रोल्ड यंत्राच्या आधारे करण्यात येणाºया भूमिगत पर्जन्यजल वाहिन्यांची विभागानिहाय साधारण लांबी पुढीलप्रमाणे...
विभाग कमान पाइप भूमिगत वाहिन्यांची
वाहिन्या वाहिन्या एकूण लांबी
(मीटरमध्ये)
ए ३५४५ ९० ३६३५
बी ३९८ २५६५ २९६३
सी १२८७ ३२४६ ४५३३
डी ३७९३ ११५३ ४९४६
ई १२३५ ६१५५ ७३९०
एफ/दक्षिण ७०२५ २९०० ९९२५
एफ/उत्तर ७८६० १७३० ९५९०
जी/दक्षिण ३६२२ ५९२३ ९५४५
जी/उत्तर ६९२८ १०८३० १७७५८
एकूण ३५६९३ ३४५९२ ७०२८५

अशी होणार सफाई :

मिनी रोबो हे यंत्र रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केले जाते. जलरोधक व लहान आकाराचे असल्याने हे यंत्र वाहिनीत जाऊन सहजपणे काम करू शकते, तसेच २८० अश्वशक्तीच्या वाहनावरील पंपास हे यंत्र जोडलेले असल्याने ते तेवढ्या ताकदीने गाळ खेचू शकेल. यावर असणाºया सीसीटीव्ही कॅमेरामुळे हे यंत्र कुठे वळवायचे व त्याचा वापर कसा करायचा? याचा निर्णय चालकास घेता येणार आहे. या यंत्राद्वारे ओढून घेतला जाणारा गाळ हा बाहेर असलेल्या टँकरच्या टाकीत साठविला जाईल, तसेच याच यंत्राद्वारे पाण्याच्या अतिशय ताकदीने केलेल्या फवाºयाने वाहिन्यांची अंतर्गत साफसफाई करता येणार आहे.

Web Title: Cleanliness of British Robbery's British Rain Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.