WhatsApp वर आलेल्या लिंकवर केले क्लिक अन् १२ लाखांची फसवणूक; नेमका प्रकार काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 06:40 PM2023-01-24T18:40:26+5:302023-01-24T18:45:02+5:30
पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला ...
पिंपरी : एका व्हॉट्सअप क्रमांकवरून डिव्हाईन काऊज ॲप विषयी माहिती देण्यात आली होती. त्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात देखील माहिती होती. त्यामुळे ते ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे गुंतवणूक करणाऱ्याची तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना २८ मार्च २०२२ ते २६ जुलै २०२२ या कालावधीत डिव्हाईन काऊज ॲपवर घडली. या प्रकरणी आशिर्वाद मुकुंद उगे (वय ३८, रा. रावेत) यांनी सोमवारी (दि.२३) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या व्हॉट्असपवर एका नंबरवरून आलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी डिव्हाईन काऊज या ट्रेडींग ॲपद्वारे तब्बल ११ लाख ९९ हजार रुपयांची गुंतवणूक केली. फिर्यादी यांनी ॲपमध्ये केलेली गुंतवणूक आणि त्यांना होणार फायदा याच्या सर्व डिटेल्स ॲपमध्ये दिसत होत्या. परंतु डिव्हाईन काऊज ॲपमधून सर्व माहिती डिलीट झाली. त्यामध्ये फिर्यादीची काहीच गु्ंतवणूक दाखवत नाही. त्यामुळे फिर्यादीला समजले की कोणतरी अज्ञात व्यक्तीने ट्रेडिंग ॲपद्वारे त्यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.