महावितरणविरोधात ग्राहक पंचायतीकडे धाव
By admin | Published: December 26, 2014 11:19 PM2014-12-26T23:19:38+5:302014-12-26T23:19:38+5:30
पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील रामदास दशरथ यादव यांनी विद्युुत वितरण कंपनीकडे सन २०१०मध्ये वीजजोड घेण्यासाठी अनामत
सासवड : पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील रामदास दशरथ यादव यांनी विद्युुत वितरण कंपनीकडे सन २०१०मध्ये वीजजोड घेण्यासाठी अनामत रकम भरली. या वेळी दोन खांब व वीजजोड शेतकऱ्यांना देण्याची योजना होती. परंतु, त्यांना आजपर्यंत वीजजोड मिळाला नाही व खांब टाकले नाहीत. उलट, यादव यांना आता सन २०१४ मध्ये ७ हजार ७४० रुपयांचे पहिले बिल आले आहे. त्यांच्या या फसवणुकीमुळे त्यांनी ग्राहक पंचायतीकडे धाव घेतली आहे.
यादव यांनी माळशिरस येथील गट क्रमांक ३२३मध्ये वीजजोड मिळण्यासाठी महावितरणच्या योजनेनुसार अनामत रक्कम भरली. परंतु, अद्यापही त्यांना वीजजोड मिळालेला नाही. याबाबत ‘लोकमत’मध्ये दि. २२ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाले; परंतु, त्याची अद्याप दाखल न घेतल्याने यादव यांनी ग्राहक पंचायतीकडे तक्रार दाखल करण्याचे ठरविले आहे. याबाबत त्यांनी ग्राहक पंचायतीचे संघटक संजय जगताप यांच्यासमवेत चर्चा केली आहे.
यादव यांना महावितरणने सन २०१०मध्ये मीटर व मीटर बॉक्स दिला होता. तो अद्यापही यादव यांच्याकडे पडून आहे. (वार्ताहर)