हवामान बदलूनही पीक जोमात, बटाट्याला पोषक वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:52 AM2017-12-11T02:52:12+5:302017-12-11T02:52:36+5:30

कुरवंडी (ता. आंबेगाव) परिसरात रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेले बटाटा पीक हवामानात होणारे बदल घडवूनसुद्धा योग्य फवारणी केल्यानंतर जोमदार आले आहे. निसर्गाच्या विविध लहरी येऊनसुद्धा शेतकरी आपले पीक टिकावे म्हणून त्यावर औषधाचे प्रयोग करून ते पीक जगवून दाखवतो.

 The climate of potato, the climate of potato, the nutritious atmosphere | हवामान बदलूनही पीक जोमात, बटाट्याला पोषक वातावरण

हवामान बदलूनही पीक जोमात, बटाट्याला पोषक वातावरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : कुरवंडी (ता. आंबेगाव) परिसरात रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेले बटाटा पीक हवामानात होणारे बदल घडवूनसुद्धा योग्य फवारणी केल्यानंतर जोमदार आले आहे. निसर्गाच्या विविध लहरी येऊनसुद्धा शेतकरी आपले पीक टिकावे म्हणून त्यावर औषधाचे प्रयोग करून ते पीक जगवून दाखवतो. हे कुरवंडी येथील रमेश दिलीप तोत्रे या शेतक-याने सिद्ध केले.
एखादी रोगाची साथ यावी अन् पशुपक्षी पटापट मरावे, अशी अवस्था निसर्र्गाने केलेल्या लहरी हल्ल्याने शेतकºयांची झाली आहे. सध्या थंडी, ऊन, हलका पाऊस अशा बदलत्या वातावरणात जीव मुठीत ठेवून शेतकरी आपल्या पिकाला जपत आहे. कुरवंडी परिसरात रमेश तोत्रे या शेतकºयाने एक महिन्यापूर्वी आपल्या एक एकर शेतात पुखराज जातीचे बटाटा पीक घेतले.
प्रतिक्विंटल ६०० रुपये दराने ११ कट्टे बटाटे लागवड केली. एक महिन्याचे पीक झाले असून, चालू हवामानात बटाट्याचा शेंड्याचा पाला कर्जळू लागला होता. त्यामुळे तातडीने औषधांची फवारणी करून युरिया खताचा वापर केला.
योग्य पाणी दिले. खुरपणी करून चांगली काळजी घेतली. बारकाईने लक्ष दिले. त्यामुळे बदललेल्या हवामानातसुद्धा बटाटा पिकाने चांगले बाळसे धरले आहे.
पीक तरारले. शेतकºयाप्रमाणे इतरांनी हवामानातील बदलांना सामोरे जाऊन पिकांची काळजी घेतली तर निकासानीपेक्षा योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन शेतकरी रमेश तोत्रे यांनी केले.
वारंवार होणाºया हवामानातील बदलांवर लक्ष ठेवावे, खते, औषधे, फवारणी, खुरपणी केल्यास पीक चांगले येऊ शकते. असा आशावाद शेतकºयांनी पीक उत्पादन घेताना ठेवला पाहिजे. कुरवंडी परिसरात अनेक शेतकरी कांदा, बटाटा, फरशी, लसूण आदी पिके घेतात; पण बदलत्या वातावरणात पिके
टिकविली पाहिजेत.

थंडीचा ज्वारीपिकाला फायदा

महुडे : भोर तालुक्यातील पश्चिम भागातील पिसावरे ,महुडे परिसरातील ज्वारी पिकाला अवकाळी पाऊस पडून गेल्याने आता थंडी पडू लागल्याने ज्वारी हे पीक अंत्यत चांगले दिसू लागले आहे.
नीरा नदी व छोटे बंधारे यांच्या किनारी ज्वारीचे पीक घेतले आहे. यावर्षी चांगले हवामान व पिकासाठी पाणीसाठा पोषक ठरत आहे. या परिसरात गेल्या वर्षी हे पीक चागल्या प्रकारे होते . यावर्षी ज्वारीचे पीक जास्त आहे. या रब्बी पिकाचा चांगला फायदा शेतकºयास ज्वारी व जनावरांना कडबा मिळतो. कडबा हा जनावरांना फायदेशीर असतो. हवामान चागले नसेल तर तर हे पीक तोट्यात जाण्याची शक्यता असते. अचानक झालेल्या आवकाळीं पावसाने या पिकावरी रोगाचे प्रमाण कमी होऊन पिके जोमात दिसू लागली आहेत.

Web Title:  The climate of potato, the climate of potato, the nutritious atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.