गिर्यारोहकांनी बाण सुळका केला सर, तीस तासांच्या प्रयत्नानंतर मोहीम फत्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 09:29 PM2021-02-03T21:29:31+5:302021-02-03T21:30:19+5:30

Pimpri-Chinchwad : अहमदनगर येथील साम्रद गावातील सांधण दरीजवळ असलेला ७१० फूट उंचीचा बाण सुळका गिर्यारोहकांना नेहमीच साद घालत असतो.

Climbers shoot arrows, sir. After thirty hours of effort, the expedition is over | गिर्यारोहकांनी बाण सुळका केला सर, तीस तासांच्या प्रयत्नानंतर मोहीम फत्ते

गिर्यारोहकांनी बाण सुळका केला सर, तीस तासांच्या प्रयत्नानंतर मोहीम फत्ते

googlenewsNext

पिंपरी : चढाईसाठी अवघड मानला जाणारा अहमदनगरमधील बाण सुळका पिंपरी-चिंचवडच्या मावळ्यांनी सर केला. तब्बल तीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर ७१० फूट उंचीचा सुळका सर करण्यात गिर्यारोहकांना यश आले.

पिंपरी-चिचंवड माउंटेनिअरिंग असोसिएशन, स्पोर्ट क्लाईम्बिंग असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आणि राजे शिवाजी क्लाईम्बिंग वॉल यांच्या संयुक्त प्रयत्नातून दहा जणांनी हा सुळका सर केला. अहमदनगर येथील साम्रद गावातील सांधण दरीजवळ असलेला ७१० फूट उंचीचा बाण सुळका गिर्यारोहकांना नेहमीच साद घालत असतो. नावाप्रमाणे बाणासारखा हा कातळ आकाशाकडे झेपावला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, मधमाशांची मोठी पोळी, दुर्गम प्रदेश आणि खडतर चढाई अशा आव्हानांचा सामना गिर्यारोहकांना करावा लागतो.

या मावळ्यांनी एक जानेवारीपासून मोहिमेची तयारी सुरू केली होती. प्रत्यक्ष २५ जानेवारीला चढाईला सुरुवात झाली. त्यानंतर तीस तासांनी २६ जानेवारीला मोहीम फत्ते झाली. नीलराज माने, मोहन हुले, तुषार खताळ, गितेश बांगरे, रोहित मडके, नीलेश मोरे, जयवंत कोकणी, संतोष मांडे, तानाजी केकरे, मयूर केकरे हे मावळे या मोहिमेत सहभागी झाले होते. माने आणि हुले यांनी सुळका सर केल्यानंतर तिरंगा फडकवित राष्ट्रगीताद्वारे मानवंदना दिली.

गेल्यावर्षी सेफ क्लाईम्बिंग इनिशिएटिव्ह (स्की) संस्थेने बाण सुळक्यावर नव्या मार्गाने चढाई करीत बोल्ट बसविले होते. याच मार्गाने चढाई करीत मावळ्यांनी बोल्टची चाचणी घेतली. गेल्या वर्षी स्कीच्या सदस्यांनी आखलेल्या मार्गामुळे चढाई सुकर झाल्याची भावना गिर्यारोहकांनी व्यक्त केली. पीसीएमए संस्थेचे संस्थापक सुरेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आखण्यात आली. गिर्यारोहक सुनील पिसाळ, विवेक मराठे, स्वानंद जोशी, नरेंद्र पाटील, श्रीकृष्ण कडुसकर, नुवाजीश पटेल यांनी मार्गदर्शन केले.
---------------
बाण सुळका १९८६ साली झाला. प्रथम सरबाण सुळक्यावर १९८६ साली प्रथम यशस्वी चढाई करण्यात आली. दिवंगत गिर्यारोहक मिलिंद पाठक यांच्या संघाने ही मोहीम फत्ते केली होती. त्यानंतर विवेक मराठे यांच्या पथकाने १९९१ मध्ये हा कडा सर केला. स्की संस्थेच्या सदस्यांनी नव्या वाटेने चढाई करीत बोल्ट लावण्याचे आव्हानात्मक काम जानेवारी २०२० मध्ये केले.
 

Web Title: Climbers shoot arrows, sir. After thirty hours of effort, the expedition is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.