नीरा नृसिंहपूर येथे श्रीलक्ष्मी नृसिंह मंदिराचा कळसारोहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:12 AM2021-08-29T04:12:55+5:302021-08-29T04:12:55+5:30
------------------------------------------ ---------:: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते कळस व ध्वजपूजन करण्यात आले: नीरा नृसिंहपूर ...
------------------------------------------
---------:: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते कळस व ध्वजपूजन करण्यात आले:
नीरा नृसिंहपूर :नीरा नृसिंहपूर तालुका इंदापूर येथील प्रसिद्ध पेशवेकालीन देवस्थान श्रीलक्ष्मी नृसिंह मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण होऊन त्या मंदिरावर सुवर्णकळस व ध्वज रुईभरचे दत्तसंस्थानचे प्रमुख आप्पाबाबा दत्तमहाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बसविण्यात आला. प्रारंभी कळसाचे पूजन विश्वस्त मंडळाचे प्रमुख प्रमोद दंडवते तसेच राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांच्या हस्ते कळसाची व ध्वजाची पूजा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील प्रशांत पाटील, दत्तामामा घोगरे, तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष सागर मिसाळ, सरपंच श्रीकांत बोडके, पांडुरंग डिसले, उपसरपंच दादासाहेब क्षीरसागर, नाथा रुपनवर व तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संचालक उदयसिंह पाटील मयूरसिंह पाटील, संचालक हरिभाऊ घोगरे, संजय बोडके, बाळासाहेब मोहिते, नाथाजी मोहिते, पोलीस पाटील शरद जगदाळे, व माजी सरपंच नरहरी काळे, श्रीकांत दंडवते, हानुमंत काळे आण्णासाहेब काळे, विलास ताटे, संतोष मोरे, प्रकाश काळे, जगदीश सुतार, विद्यमान सरपंच चंद्रकांत सरवदे, विजय सरवदे, उपसरपंच विठ्ठल देशमुख, ग्रामपंचायत सदस्य आनंद काकडे, चित्रपट अभिनेता नितीन सरवदे, डॉ. सिद्धार्थ सरवदे, दशरथ राऊत, अभयकुमार वांगकर, अरुण क्षीरसागर, उद्योजक दत्ता कोळी, कमलेश डिंगरे, प्रशांत बादले, मगनदास क्षीरसागर, रघुनाथ सरवदे उपस्थित होते. सोहळा पार पडला या धार्मिक सोहळ्याचे यजमान म्हणून मुख्य पुजारी श्रीकांत दंडवते व भाग्यश्री दंडवते यांनी संपूर्ण होमहवन, यज्ञ, नवग्रह पूजाविधी केले. या सोहळ्यासाठी मुख्य विश्वस्त प्रमोद दंडवते, डाॅ. प्रशांत सुरू, प्रकाश सुरू, ज्ञानेश्वर अरगडे, पोलीस पाटील, अभयकुमार वांकर पाटील, श्रीकांत दंडवते तसेच नारायणराव ताटे-देशमु, सूर्यनारायण दंडवते हे सर्व कुटुंबीयांसह उपस्थित होते. पौराेहित्य वेद शा.ओंकार शास्री डिंगरे यांनी केले. या सोहळ्यासाठी व्यवस्थापक अविनाश दंडवते यांनी परिश्रम घेतले.
लक्ष्मी नृसिंहाच्या कळसाचे पूजन करीत असताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
लक्ष्मी नृसिंहाच्या कळसाचे पूजन करीत असताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील