पुण्याच्या मार्केट यार्डामधील गुळाचे लिलाव बंद : ई-नाम व ई-लिलाव पध्दतीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:34 PM2019-05-09T12:34:17+5:302019-05-09T12:38:35+5:30
पुण्याच्या बाजारपेठांमधील गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ सुरु असलेली गुळाच्या लिलावाची पध्दत अखेर बंद पडली आहे.
पुणे : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार योजने अंतर्गत पुण्याच्या बाजारपेठांमधील गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ सुरु असलेली गुळाच्या लिलावाची पध्दत अखेर बंद पडली आहे. पुणे बाजार समितीच्या वतीने गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील भुसार बाजारात ई-नाम व ई-लिलावची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. ई-लिलाव पध्दतीमुळे प्रत्यक्ष मालाचा दर्जा कळत नसल्याने व्यापाºयांनी थेट शेतक-यांकडे जाऊन माल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मार्केट यार्डामध्ये सुरु असलेले गुळाचे ३० ते ४० लिलाव देखील बंद पडले आहेत. याचा फटका शेतक-यांना बसणार असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले.
याबाबत दि. पुणे जॅगरी मर्चट्स अससोसिएशनचे अध्यक्ष अजित सेठिया यांनी सांगितले की, पुण ेकृषी उत्पन्न बाजार समितीने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजर योजने अंतर्गत ई-नाम योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे लेखी पत्र सर्व आडते व व्यापाºयांना दिले. याची अंमलबजावणी न करणाऱ्या अडत्यांवर कारवाई करण्यात येईल अशा इशारा देखील दिला आहे. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ई-नामच्या माध्यमातून गुळाचा लिलाव देखील ऑनलाईन पध्दतीने करण्याचे आदेश दिले आहेत. परतं आॅनलाईनवर गुळाचा दर्जा व इतर गोष्टी लक्षात येत नाही. यामुळे ऑनलाईन पद्धतीने गुळ खरेदी करण्यास व्यापारी तयार नाहीत. याशिवाय गुळाची गाडी व वाहतूकच भाडे देखील व्यापारी या ई-नाम पध्दतीमुळे रोख स्वरुपात देऊ शकत नाहीत. तसेच इतर अनेक अडचणी असल्याचे गुळाच्या व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या निदर्शनास आणून दिल्या. परंतु याबाबत कोणताही तोडगा काढला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी आता जागेवार थेट व्यापारी व आडत्यांना गुळाची विक्री सुरु केली आहे. यामुळे स्पर्धा कमी झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे अजित सेठिया यांनी सांगितले.