कारखाने काही दिवस बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:55+5:302021-05-05T04:17:55+5:30
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण परिसरातील एमआयडीसी कार्यक्षेत्रातील सर्व कारखाने सुरू असून यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत ...
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण परिसरातील एमआयडीसी कार्यक्षेत्रातील सर्व कारखाने सुरू असून यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून चाकण एमआयडीसी मधील सर्व कारखाने काही दिवस बंद ठेवावेत. कितीही कडक निर्बंध लावले तरी या क्षेत्रातील कारखाने ते नियम पाळत नाहीत. तसेच कारखान्यांमधे मोठ्या प्रमाणात कामगारांची गर्दी होत आहे. कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या गावातील, शहरातील कामगार एकमेकांच्या संपर्कात येतात. कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे चाकण परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे. गतवर्षी चाकण परिसरातील एमआयडीसी मधील कारखाने बंद ठेवल्यामुळे कोरोना आटोक्यात आला होता. तरी लवकरात लवकर चाकण परिसरातील एमआयडीसी मधील कारखाने ताबडतोब काही दिवसांसाठी बंद करावेत. अन्यथा रिपाई (आठवले)च्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन रिपाइंचे राज्य सचिव हरेशभाई देखणे यांनी खेड तालुक्याचे प्रांतअधिकारी यांना दिले. यावेळी नायब तहसीलदार संतोष चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी खरपुडी गावचे माजी सरंपच दत्तोबा काळे, राहुल सावंत उपस्थित होते.