पुण्यात विविध ठिकाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:06 AM2018-07-28T03:06:18+5:302018-07-28T03:06:45+5:30

मराठा समाजाच्या भावना तीव्र; रास्ता रोको व गाव बंद ठेवण्यावर भर

Close to various places in Pune | पुण्यात विविध ठिकाणी बंद

पुण्यात विविध ठिकाणी बंद

Next

नीरा : तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पुरंदर तालुक्यातील सर्व गावांमध्ये बंद पाळण्यात आला. गेली दोन तीन दिवस महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलना मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या दरम्यान पुरंदर तालुक्यातील प्रमुख शहरांमध्ये कुठेही आंदोलनाची धग जाणवली नाही.
शुक्रवारी सकल मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने पुरंदर तालुका बंदची हाक दिली होती. नीरा शहरात सकाळ पासून दिवसरभर कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील युवकांनी होतात भगवे झेंडे घेऊन नीरा शहरात फेरी काढून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, सोमेश्वर कारखान्याच्या संचालक दिलीप थोपटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण जेधे, कुलदीप पवार, कु.प्रियंका यादव-सुळसकर, कांचन निगडे, राजेश काकडे, सचिन मोरे, अनिल चव्हाण, राजेंद्र धुमाळ, दयानंद चव्हाण, राजेश काकडे, यांनी तीव्र संताप व्यक्त करत शासनाचा निषेध केला. उपस्थिती युवकांनी मागील आठवड्यात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे व रोहन तोडकर या तरूणांना श्रद्धांजली वाहत राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. नीरेच्या तलाठी शितल खराद यांना राजेंद्र थोपटे, नंदकुमार शिंदे व सचिन मोरे यांनी मराठा आंदोलनातील मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी नीरेचे उपसरपंच बाळासाहेब भोसले उपस्थित होते. अजीत सोनवणे यांनी प्रास्ताविक केले तर पृथ्वीराज निगडे यांनी
आभार मानले.

शहरासह परिसरातील पिंपरे (खुर्द) निंबुत, गुळूंचे, राख, कर्नलवाडी, पाडेगाव, जेऊर, मांडकी, येथील युवकांनसह ज्येष्ठांनी एकत्र येत नियोजत पुरंदर तालुका बंद आंदोलन केले. नीरेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणावर युवक एकत्र येत सकाळी अकरा वाजता नीरा शहरात फेरी काढून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. नीरा ग्रामपंचायती समोर पुणे-पंढरपुर पालखी मार्गावर प्रतीकात्मक रस्तारोको आंदोलन करण्यात आले. ह्या आंदोलनाला नीरा बाजारपेठेतील व्यावसायिकांनी अभुतपुर्व प्रतीसाद देत सहकार्य केले. आंदोलनावेळी हजारोंच्या संख्येने युवक उपस्थित होते. मराठा आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आंदोलना दरम्यान कोणा आंदोलकांनवर गुन्हा दाखल झाल्यास त्यांचे दावे विनाशुल्क चालवण्याचे पत्र अँड.सो. शुभांगी कुलदीप पवार यांनी
यावेळी दिले.

आंदोलकांकडून मंचर-भीमाशंकर रस्त्यावर केला रास्ता रोको

डिंभे : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गुरूवार (ता. २६) रोजी डिंभे (ता. आंबेगाव) मंचर-भिमाशंकर रस्त्यावर रास्ता रोक ो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास सर्व जाती धर्मांतील संघटनांनी पाठिंबा दिला. व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
मराठा संघटना समितीने राज्यभर पुकारलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागापर्यंत पोहचले. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गुरूवारी डिंभे बंदची हाक देण्यात आली. सकाळी ११ ला डिंभे येथे शिवाजी महाराजांच्या पुतळयाले पुष्पहार अर्पण क रून गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर डिंभे येथे मंचर भिमाशंकर रस्ता रोको करण्यात आला. यावेळी डिंभे येथील व्यापारी संघाला आदिवासी संघटना, मागासवर्गीय संघटना यांनी उस्फुर्त पाठिंबा दिला.
यावेळी विविध संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. मोर्चाचे नेतृत्व सौरव राक्षे, शिवराज राक्षे, विलास सुर्यवंशी, संतोष राक्षे, प्रदिप अमोंडकर, आनंद राक्षे, विकास कोकणे, तुकाराम ढेरंगे, किरण राक्षे, गणेश शिरसाठ, गणेश कसबे, हेमंत राक्षे, खंडू थोरात, ब्रम्हा ठाकूर, किशोर कोकणे, तुकाराम राक्षे, विनायक सातकर, नितीन बो-हाडे, शंकर नायडू, सुरज घोलप, आकाश राक्षे, संतोष घोलप, मंगेश क ानसकर, पो पाटील शशिकांत भवारी, राजेंद्र साळवे, सिताराम कोकणे, विलास कोकणे, अनिल कोकणे, आदि सर्वपक्षिय कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


आरक्षणासाठी सोमवारी खेड बंद
चाकण : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने खेड तालुक्यात सोमवार (दि. ३०) रोजी बंद पुकारण्यात आला आहे.
या वेळी सकाळी १० वाजता चाकण मार्केटयार्ड- श्री शिवाजी प्रशाला- महात्मा फुले चौक- नगरपरिषद- माणिक चौक या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज तळेगाव चौकात मोर्चा जाणार आहे. याठिकाणी पुणे-नासिक महामार्गावर रास्ता रोको व शोकसभा होईल. समाजासाठी आत्मबलिदान दिलेल्या व्यक्तिंना श्रद्धांजली वाहुन मोचार्ची व सभेची सांगता होईल. यादिवशी खेड तालुक्यातील सर्व व्यावसायीकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवुन आंदोलनास आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज खेड तालुका यांनी केले आहे. या बंदमधून हॉस्पिटल, मेडिकल, रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शांततामार्गे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 

Web Title: Close to various places in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.