वरंध घाटातील बंद असलेला भोर-महाड रस्ता १० महिन्यांनंतर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:48+5:302021-06-03T04:08:48+5:30

भोर-महाड रस्त्यावर वरंध घाटात संरक्षक भिंत कोसळली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी १० फेब्रुवारी ते ३० एप्रिलदरम्यान काम बंद ठेवण्यात आले ...

The closed Bhor-Mahad road in Warandh ghat starts after 10 months | वरंध घाटातील बंद असलेला भोर-महाड रस्ता १० महिन्यांनंतर सुरू

वरंध घाटातील बंद असलेला भोर-महाड रस्ता १० महिन्यांनंतर सुरू

Next

भोर-महाड रस्त्यावर वरंध घाटात संरक्षक भिंत कोसळली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी १० फेब्रुवारी ते ३० एप्रिलदरम्यान काम बंद ठेवण्यात आले होते; मात्र काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ८० दिवसांत पूर्ण होणाऱ्या कामाला एक चार महिने लागले आहेत. मागील १० महिने रस्ता बंद असून याचा उद्योग, व्यवसायावर मोठा परिणाम झालेला होता. त्यामुळे कोकणात जाणारे पर्यटक प्रवासी नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी होत होती. अखेर एक जूनपासून भोर-महाड रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटातील महाड तालुक्याच्या हद्दीतील एका तीव्र वळणावरील संरक्षक भिंत १२ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. मागील ९ महिन्यांपासून वाहतूक बंद होती. सदरच्या दुरुस्तीच्या कामासाठी ५ कोटी ४० लाख ५५ हजार निधी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्याकडे मंजूर करण्यात आला होता. १० फेब्रुवारीपासून भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. सदरचे काम ८० दिवसांत ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. त्यामुळे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भोर-महाड रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आला होता. दरम्यान, महाड बांधकाम विभागाकडून दिलेली ३० एप्रिलची मुदत संपून जवळ जवळ एक महिना अधिक झाला, तरीदेखील काम पूर्ण झाले नव्हते.

Web Title: The closed Bhor-Mahad road in Warandh ghat starts after 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.