बंद काळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:23+5:302021-04-15T04:10:23+5:30
बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजची मागणी बारामती: राज्यात सर्वत्र बुधवारी संध्याकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयानुसार ...
बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजची मागणी
बारामती: राज्यात सर्वत्र बुधवारी संध्याकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयानुसार बारामती एमआयडीसीतील विविध उद्योग चालू राहणार आहेत. या उद्योगांमध्ये काम करणारे कामगारांना कंपनीचे ओळख पत्रावर कामावर जाणे- येणेसाठी परवानगी देण्याबाबत पोलिसांना सूचना द्याव्यात,अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना पत्र दिले आहे. त्यानुसार एमआयडीसीत निर्यात करणारे उद्योग व त्यांचे सप्लायर्स, व्हेंडरसह विविध मोठ्या कंपन्या, त्यांचे १५० पेक्षा व्हेंडर आहेत. याशिवाय काही अन्य उद्योग हे बंद मध्ये ही चालु राहणार आहेत.याशिवाय टेक्सटाइल पार्क व इतर मास्क बनविणारे कारखानेही सुरू राहणार आहेत.
संघटनेच्या अंदाजानुसार एमआयडीसीत ७५ टक्के कारखाने चालू राहणार आहेत .त्यामुळे या उद्योगांमध्ये काम करणारे कामगारांना कंपनीचे ओळख पत्रावर कामावर जाणे-येणेसाठी परवानगी देणेच्या पोलीस खात्याला सूचना द्याव्यात,अशी मागणी करण्यात आली आहे.सध्याचे या करोना महामारी संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्ही सर्व प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळू तशेच प्रशासनास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन चेंबरच्या वतीने देण्यात आले आहे.