दोन महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:08 AM2021-05-30T04:08:55+5:302021-05-30T04:08:55+5:30

—बारामतीत व्यापाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे बारामती: शहरात कोरोना संकट रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. ...

Closed for two months | दोन महिन्यांपासून बंद

दोन महिन्यांपासून बंद

Next

—बारामतीत व्यापाऱ्यांचे

उपमुख्यमंत्र्यांना साकडे

बारामती: शहरात कोरोना संकट रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यापारीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी परवागनी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालण्यात आले आहे.

याबाबत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी पवार यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार मागील दोन महिन्यांपासून राज्य सरकारच्या आदेशानुसार ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बारामती शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. सर्व व्यापाऱ्यांनी पूर्णपणे या मोहिमेत सहभाग घेतला. तसेच ही मोहीम यशस्वी होण्यासाठी खंबीर साथ दिली.

परंतु, या २ महिन्यांत बंदमुळे व्यापाऱ्यांची अडचण देखील वाढलेली आहे. या दोन महिन्यांत व्यापार बंद होता. मात्र, कामगारांचा पगार, बँकेचे व्याज, सरकारी टॅक्स, वीजबिल, टेलीफोन बिल, जागा भाडे, नगर परिषद टॅक्स आदी खर्च मात्र सुरूच होते. या सर्वबाबींमुळे व्यापारी हतबल झाला आहे. आता ही व्यापारी अडचण व्यापारी पेलू शकत नाही. त्यामुळे १ जूनपासून सर्व व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, व्यापारी सर्व नियमांचे पालन करून व्यापार सुरू करतील, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Closed for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.