संपूर्ण शहराचा उद्या पाणीपुरवठा बंद
By admin | Published: April 19, 2017 04:25 AM2017-04-19T04:25:29+5:302017-04-19T04:25:29+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील वडगाव, लष्कर, एसएनडीटी व होळकर पंपिंग स्टेशनच्या देखभाल
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील वडगाव, लष्कर, एसएनडीटी व होळकर पंपिंग स्टेशनच्या देखभाल, दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे गुरुवार (दि.२०) रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरामध्ये गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद असल्याने शुक्रवारी (२१ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमीदाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरीही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे : शहरातील सर्व पेठांचा भाग, दत्तनगर, राजेंद्रनगर, पर्वतीगाव, पद्मावती, सहकारनगर, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वेरोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणे, कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, पर्वती, पद्मावती टँकरभरणा केंद्र, एसएनडीटी एचएलआर झोनच्या अखत्यारीमधील डेक्कन परिसर, एरंडवणे, गोखलेनगर, चतु:शृंगी, मॉडेल कॉलनी, भोसले नगर, सेनापती बापट रस्ता, खैरवाडी, घोलेरोडे, शिवाजीनगर पोलीस लाइन, वडारवाडी, बोपोडी, पुणे विद्यापीठ, रेंजहिल्स, पंचवटी पाषाण, सोमेश्वरवाडी, सूसरोड, पाषाण-बाणेर लिंकरोड, विधातेवस्ती.
वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगावपठार, दत्त नगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.
लष्कर जलशुद्धीकरण केंद्र : पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, वडगाव शेरी, चंदन नगर, नगर रस्ता, कल्याणी नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी, विश्रांतवाडी.
नवीन होळकर पंपिंग स्टेशन : विद्या नगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर.
(प्रतिनिधी)