गुरूवारी शहराचा पाणीपुरवठा बंद
By admin | Published: November 8, 2016 01:51 AM2016-11-08T01:51:11+5:302016-11-08T01:51:11+5:30
पर्वती, वडगाव, लष्कर, वारजे, नवीन होळकर पंपिंग येथील जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी (ता. १०) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे
पुणे : पर्वती, वडगाव, लष्कर, वारजे, नवीन होळकर पंपिंग येथील जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी (ता. १०) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (ता. ११) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आली आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा भाग
पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, एसएनडीटी, एरंडवणा, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे. नं. ४२, ४६ (कोंढवा खुर्द), पर्वती टॅँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र
चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलशुद्धीकरण केंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, गणंजय सोसायटी, एकलव्य महाविद्यालय भाग, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे महामार्ग परिसर, वारजे, माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण भाग, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता.
वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक
लष्कर जलकेंद्र भाग : लष्कर, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी.
नवीन होळकर पंपिंग भाग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रस्ता. (प्रतिनिधी)