आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:00+5:302021-01-08T04:34:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळेघर : आदिवासी समाजाच्या मुलींवर जुन्नर तालुक्यातील तांबे व रायगड जिल्ह्यातील पेण येथे झालेल्या बलात्कार घटनेचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : आदिवासी समाजाच्या मुलींवर जुन्नर तालुक्यातील तांबे व रायगड जिल्ह्यातील पेण येथे झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी बिरसा ब्रिगेड सह्याद्री आंबेगाव तालुका यांच्या वतीने आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यात दुकाने बंद करून एक दिवसाचा बंद पाळण्यात आला.
काही दिवसांपूर्वी जुन्नरमधील तांबे आणि रायगड मधील पेन या ठिकाणी आदिवासी मुलींवर झालेल्या बलात्कारातील आरोपीना पोलीस प्रशासनाने तत्परतेने केलेल्या अटकेबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानत आदिवासी समाजाच्या मुलींवर झालेल्या घटनांच्या निषेधार्थ तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये एक दिवस बंद करून जाहीर निषेध करण्यात आला.
या बंदला भीमाशंकर, निगडाळे, म्हतारबाचीवाडी, कोंढवळ, चिखली, तळेघर, जांभोरी, फलोदे, राजपूर, पोखरी, राजेवाडी येथील ग्रामस्थांनी पाठींबा दर्शवित एक दिवस सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवले. हा बंद स्वयंस्फूर्तीने करण्यात आला. शांततेच्या मार्गाने करण्यात आलेल्या या संपामध्ये परिसरातील सर्व आदिवासी बांधव सहभागी झाले होते. भीमाशंकर खोऱ्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमाशंकर आणि तळेघर या बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. बंद घडवून आणणण्यासाठी बिरसा ब्रिगेडचे आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष प्रवीण पारधी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
चौकट
महासुराच्या १२ राजधान्यांपैकी ६ वी राजधानी असणारे भीमाशंकर हे एकमेव पवित्र ठिकाण आहे. जगातील कोणत्याच शिवलिंगाला हळदी-कुंकू लावले जात नाही. परंतु भीमाशंकर एकमेव आहे जिथे यांचबरोबर वर्षातून दोन वेळा महादेव (महासूर) आणि आई कळमजाई एकमेकांना भेटायला येतात. स्त्रीची पूजा, सन्मान आणि आदर करणारा (मातृसत्ताक) आपला समाज. म्हणून सांस्कृतिकदृष्ट्या आम्ही मातृपूजक. म्हणजेच मातृसत्ताक पद्धती आमच्या नसानसांत भिनलेली. नव्हे तो आमचा सांस्कृतिक ठेवा आहे. आमच्या गण, टोटेम पद्धतीत आम्ही महादेवाचे वंशज असं जेवढ्या अभिमानाने सांगतो त्याचं आभिमानाने स्त्रीत्वाचाही सन्मान राखतो. म्हणून स्त्रीवरील अशा निर्घृण अत्याचाराचा निषेध करणे हा आमचा संविधानिक हक्क आहे." - प्रवीण बुधाजी पारधी,
कार्याध्यक्ष बिरसा ब्रिगेड
आंबेगाव तालुका,
फोटो ई मेल करत आहे फोटो: : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यात दुकाने बंद करुन एक दिवसाचा बंद करण्यात आला.
तळेघर वार्ताहार संतोष जाधव