नको ताम्हीणी, नको माळशेज घाट ; हा आहे पुण्याच्या सर्वांत जवळचा धबधबा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 08:05 PM2019-07-27T20:05:21+5:302019-07-27T20:07:29+5:30

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत.संपूर्ण राज्यभरातून पर्यटक कोकण, महाबळेश्वर, लोणावळा या ठिकाणी धबधबे पाहण्यासाठी व पावसाचा आनंद घेण्यासाठी जात असतात.

this is the closest waterfall from Pune city | नको ताम्हीणी, नको माळशेज घाट ; हा आहे पुण्याच्या सर्वांत जवळचा धबधबा 

नको ताम्हीणी, नको माळशेज घाट ; हा आहे पुण्याच्या सर्वांत जवळचा धबधबा 

googlenewsNext

 पुणे  (कात्रज) : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत.संपूर्ण राज्यभरातून पर्यटक कोकण, महाबळेश्वर, लोणावळा या ठिकाणी धबधबे पाहण्यासाठी व पावसाचा आनंद घेण्यासाठी जात असतात.पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज बोगद्याच्या ४०० मीटर आधी हा नैसर्गीक धबधबा सुरु झाला आहे. 
          पुणेकर नागरीकांसाठी तर ही एक पर्वणीच ठरत आहे.कोठेही लांब व खराब रस्त्याने निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जाण्याची आवश्यकता आता पुणेकरांना राहिली नाही.दक्षिण पुण्याच्या प्रवेशद्वारावरच जनू हा धबधबा सर्व पर्यटकाचे स्वागत करीत आहे. अनेक वाहनांच्या रांगा कात्रज घाटात हा धबधबा पाहण्यासाठी व येथे भिजण्यासाठी , फोटो काढण्यासाठी लागत आहेत.आता सध्या पाऊस जोरात सुरु असल्यामुळे हा धबधबा वेगात सुरु आहे.परंतु पाऊस कमी झाल्यावर हा तितक्या वेगात चालू राहील का यात शंका आहे.म्हणुन वेळ न दवडता निसर्गप्रेमीनी एखदा हा धबधबा नक्की पहावा.कात्रज बोगद्याच्या सुमारे ४०० मीटर आधी हा धबधबा सध्या वाहत आहे.

Web Title: this is the closest waterfall from Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.