मंचर टपाल कार्यालयातील रजिस्टर सेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:48 PM2018-11-14T23:48:39+5:302018-11-14T23:49:04+5:30
कर्मचाऱ्यांचा अभाव : १० दिवसांपासून नागरिक त्रस्त
मंचर : कर्मचाऱ्याअभावी मंचर येथील टपाल कार्यालयातील रजिस्टर व इतर सेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. टपाल कार्यालयात आधारकार्ड काढणे बंद झाल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे.
मंचर येथील टपाल कार्यालयात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. नारायणगाव, जुन्नर या पोस्ट आॅफिसपेक्षा मंचर पोस्ट आॅफिसमध्ये कामाचा व्याप जास्त आहे. मात्र त्या तुलनेत कर्मचाºयांची संख्या कमी आहे. १ पोस्टमास्तर, २ क्लार्क, ३ पोस्टमन, २ मदतनीस यांना सर्व काम पाहावे लागते. कर्मचाºयाअभावी रजिस्टर, मनिआॅर्डर, स्पीडपोस्ट, पार्सल या सेवा मागील १० दिपसांपासून बंद आहे. यापूर्वी ही कामे करणारा क्लार्क लोणी येथील पोस्ट आॅफिसमध्ये काम करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे कामकाज ठप्प झाले.
बिहार येथून नवीन कर्मचारी आला. मात्र, त्याने सुट्टी घेतली आहे. दुसºया एका नवीन कर्मचाºयाची नेमणूक करण्यात आली. मात्र त्याचे प्रशिक्षण झाले नसल्याने त्याला पासवर्ड नाही. परिणामी पोस्ट आॅफिसमधील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. नवीन कर्मचाºयाचे ट्रेनिंग झाले नसल्याने त्याला पासवर्ड मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हेलपाटे मारावे लागत आहे. नागरिकांना तातडीने कागदपत्रे पाठविण्यासाठी तसेच कायदेशीर कामासाठी रजिस्टर पाठविणे महत्त्वाचे असते. मात्र ही सेवा बंद असल्याने अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पोस्ट आॅफिसमध्ये आधारकार्ड अपडेट करण्यासाठी माणूस उपलब्ध नसल्याने ती सेवा बंद आहे. आधारकार्ड काढणारा कर्मचारी दुसरे काम पाहतो. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे.
४१० दिवस रजिस्टर सेवा ठप्प असल्याने नागरिक जाब विचारत आहे. मंचरमधील नागरिकांना रजि. पाठविण्यासाठी कळंब अथवा इतर पोस्ट आॅफिसमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. पोस्ट आॅफिसमध्ये काम करणाºया कर्मचाºयांवर कामाचा लोड वाढला आहे. पोस्ट आॅफिसमध्ये प्रशिक्षित कर्मचाºयाची तातडीने नेमणूक करून बंद असलेल्या रजि. व इतर सेवा तातडीने सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.