कमला नेहरू रुग्णालयातील ६ डायलिसीस मशिन बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:29 AM2019-02-06T01:29:01+5:302019-02-06T01:31:34+5:30
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील सहा डायलिसीस मशिन गेल्या दहा दिवसांपासून बंद पडल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे.
पुणे : महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील सहा डायलिसीस मशिन गेल्या दहा दिवसांपासून बंद पडल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. शहरातील सुमारे ६३ रुग्ण नियमितपणे येथे डायलिसीससाठी येतात; परंतु मशिन बंद पडल्याने नियमित येणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत असून, वेळेत डायलिसीस न झाल्याने गरीब कुटुंबांतील दोन रुग्ण अत्यवस्थ आहेत. सध्या या दोन्ही रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डायलिसीस यंत्रणा तत्काळ सुरू करावीत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधीने दिला.
कमला नेहरू रुग्णालयामध्ये तीन वर्षांपूर्वी गरीब रुग्णांसाठी मोफत डायलिसीस सुरू करण्यात आले. सुरुवातीला लायन्स क्लबकडून ही यंत्रणा राबविण्यात येत होती. मोफत सुविधेमुळे शहराच्या विविध भागांमधील गरीब रुग्णांचा ओघ वाढला आहे; परंतु दहा दिवसांपूर्वी अचानक एकाच वेळी सर्व मशिन दुरुस्तीला नेतो, असे सांगून नेण्यात आली आहेत. डायलिसीस ही अत्यावश्यक सेवा असताना ती अचानक बंद ठेवण्यामागे काही तरी काळेबेरे असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांनी केला आहे. अचानक सेवा बंद केल्याने नियमितपणे डायलिसीससाठी येणाºया रुग्णांचे हाल होत आहेत. यांपैकी दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जावळे यांनी सांगितले.
जावळे म्हणाल्या, की येथे होणाºया डायलिसीसचा आॅडिट रिपोर्ट करावा, अशी मागणी सातत्याने करीत आहोत; परंतु प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. डायलिसीस चालकाला पालिकेकडून दरमहा ६ ते ८ लाख बिल अदा केले जाते, अशी आमची माहिती आहे.
डायलिसीस यंत्रणा तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न
कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसीस मशिन गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. याबाबत संबंधित डायलिसीस केंद्र चालकासोबत केलेल्या कराराची तपासणी करून तातडीने त्याला नोटीस बजवावी, असे आदेश अधिकाºयांना दिले आहेत. डायलिसीस यंत्रणा तातडीने सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- रामचंद्र हंकारे,
आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका