उंडवडी परिसरात ढगफुटी, १५ घरांमध्ये शिरले पाणी, शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 03:54 PM2020-09-07T15:54:02+5:302020-09-07T15:59:42+5:30
पावसामुळे परिसरात अनेक शेती क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
उंडवडी कडेपठार : बारामती तालुक्यातील जिरायती भाग समजणारा उंडवडी सुपे या भागात रविवारी ( दि.६) सायंकाळी ८ वाजता ढगफुटी झाल्याने येथील दुकानात तसेच घरात पाणी शिरले. रस्त्यालाही ओढ्याचे स्वरुप आले होते.सर्व रस्ते जलमय झाले आहेत.ओढ्याच्या बाजूला असणाऱ्या १५ घरामध्ये पाणी जाऊन चाऱ्यासह, धान्ये, कपडे,घराच्या परिसरात असणारी भांडी वाहून गेली आहेत.जिरायत भाग हा कायम दुष्काळाचा सामना करणारा भाग आहे.
दरवर्षी डिसेंबर महिना संपला की पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरवर अवलंबून असतो. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण होत आहेत.जरी पाऊस भरपुर असला तरी शेतात उत्पन्न शून्यच आहे कारण,पिके हातातोंडाशी आली की वादळी वारे आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे सर्व पिकांचे पूर्णपणे नुकसान होत असल्याने कसलेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातून सावरते ना सावरते तोच रविवारी दिवस घातकच ठरला. इतरवेळी पाणी पाणी करणारे शेतकरी परंतु या ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे हैराण झाले आहे. २-३ तास पाऊस झाला तरी थांबायचे नावच घेईना,घरात पाणी दुकानात पाणी त्यात लाईट नाही जीव मुठीत धरुन येथील नागरिक पाऊस थांबायची वाट पाहत आहे.परंतु, रात्रभर पाऊस पडल्याने येथील ग्रामस्थांना व शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उंडवडी सुपे येथील ग्रामस्थांच्या घरामध्ये व दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील मालाबरोबर घरातील धान्ये तसेच इतर वस्तू पाण्यात वाहून गेल्या आहे. घरांच्या सर्वबाजूने पाणी वाहत जात असल्याने याठिकाणी ओढ्याचे स्वरूप तयार झाले होते.त्याचबरोबर उंडवडी कडेपठार, जराडवाडी या गावातील ओढ्याल्या नदीचे स्वरूप आले. तर जनावरांच्या गोठ्यातुन भुसा आणि संतोष जराड यांच्या ८५ कोंबड्या वाहून गेल्या आहेत.
पावसामुळे परिसरात अनेक शेती क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसाचा जोर इतका प्रचंड होता की,शेतांचे बांध देखील फुटून गेले आहेत. बाजरी, मका, कडबा, ऊस त्याबरोबर अशी इतर काही ठिकाणची पीके भुईसपाट झाली आहेत तर काही ठिकाणची पिके अक्षरश: वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन-अडीच फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होऊन २-३ किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणचे पुल वाहून गेल्याने रस्ते बंद होते..
लोकांच्या घरात व गुरांच्या गोठ्यात पुराचे पाणी शिरले. तसेच शेतकऱ्यांची बाजरीची ऊसाची पिके जमीनदोस्त झाली.शेतजमिनीतील माती वाहून गेली. गावातील काही वस्त्यांवर जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच काही पाणी साठवण बांध तलाव यांना धोका निर्माण झाला आहे.गावातील प्रत्येक भागात अशीच परिस्थिती असून प्रशासनाने याची दखल घेऊन पाहणी करून नुकसानभरपाई देण्यात यावी.
कल्पना साळुंके सरपंच, जराडवाडी