पाषाणला ढगफुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:08+5:302021-07-07T04:14:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संपूर्ण राज्य पावसाच्या प्रतीक्षेत असताना पाषाण येथील काही भागात मंगळवारी (दि. ६) दुपारी ढगफुटीसारखा ...

Clouds over the rock | पाषाणला ढगफुटी

पाषाणला ढगफुटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संपूर्ण राज्य पावसाच्या प्रतीक्षेत असताना पाषाण येथील काही भागात मंगळवारी (दि. ६) दुपारी ढगफुटीसारखा पाऊस झाला. काही समजायच्या आत मेघगर्जनेसह अचानक जोरदार पाऊस झाला. विशेष म्हणजे, त्याचवेळी शेजारच्या औंध, पुणे विद्यापीठ परिसरात थोडाही पाऊस झाला नाही.

पाषाणचा काही भाग आणि बाणेर या परिसरात हा पाऊस झाला. पाषाण येथे हवामान विभागाचे पर्जन्यमापन केंद्र असल्याने या ठिकाणी अवघ्या तासांत ७७.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दिवसाचे उच्च तापमान आणि जास्त आर्द्रता यामुळे स्थानिक हवामानात अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे दुपारच्या वेळी ‘कम्यलोनिंबस’ परिस्थिती निर्माण झाली. खालून हवेचा दाब अधिक असल्याने पाणीदार ढगाची निर्मिती झाली. ढगामध्ये एकावर एक बाष्पाचे थर तयार झाले. त्याचवेळी खालून येणाऱ्या हवेच्या दाबापेक्षा या ढगाचे वजन अधिक झाल्याने तो मर्यादित क्षेत्रात कोसळला. लोहगाव भागातही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण होत होती. परंतु, तेथे पाऊस झाला नाही, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

चौकट

अंदाज

-शहरात पुढचे दोन ते तीन दिवस आकाश ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Web Title: Clouds over the rock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.