मुळशी व टेमघर धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मुळा- मुठा नद्यांना पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 04:26 PM2021-07-22T16:26:14+5:302021-07-22T16:32:35+5:30

मागील दोन दिवसांपासून पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे मुळशी तालुक्यात अनेक गावांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे.

Cloudy rain in Mulshi and Temghar dam areas; Radish- flood a handful of rivers | मुळशी व टेमघर धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मुळा- मुठा नद्यांना पूर

मुळशी व टेमघर धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मुळा- मुठा नद्यांना पूर

googlenewsNext
ठळक मुद्देछोट्या नदी नाल्यांनाही पूर आला असून गावातील रस्ते जलमय पुढील ४८ तास पावसाचा जोर कायम असल्याचा अंदाज रस्ते वाहून गेल्याने मुळशी भागातील गावांचा संपर्क तुटला

पौड : मुळशी तालुक्यात गेली दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गेली अनेक दिवस दमदार पावसाची प्रतीक्षा होती. शेतकऱ्यांच्या भात लागवडीही खोळंबल्या होत्या. परंतु मागील दोन दिवसांपासून पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे मुळशी तालुक्यात अनेक गावांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे.

मुळशी धरण व टेमघर धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे धरणे भरली नसली तरी धरणाच्या खालील भागातही अधिक पाऊस झाल्याने मुळा- मुठा नद्याना पूर आला तसेच छोट्या नदी नाल्यांनाही पूर आला असून गावातील रस्ते जलमय झाले आहेत. काही रस्ते वाहून गेल्याने या भागातील गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती वेगरेचे माजी सरपंच भाऊ मरगळे व वळणेचे सरपंच समीर सातपुते यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सांगितले की, धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, प्रशासनातील स्थानिक अधिकाऱ्याना संबंधित गावातील आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर नुकसानीचे अंतिम पंचनामे करण्यात येणार आहेत.

दरम्यान दिवसभरात पुणे - कोलाड मार्गावर व वळणे ते शेदा शेडाणी मार्गावर दरडी कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दिवसभरात दरडी कोसळले ल्या ठिकाणचा राडारोडा काढून रस्ते सुरळीत करण्याचे काम सुरू होते .तसेच कोळवन ते हाडसी दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील ४८ तास पावसाचा जोर कायम असल्याचा अंदाज वर्तवला जात असल्याने तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Cloudy rain in Mulshi and Temghar dam areas; Radish- flood a handful of rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.