वरुणराजा जाणार सुट्टीवर! पुण्यात २ दिवस ढगाळ वातावरण, घाट माथ्यावर मात्र मुसळधार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:42 PM2023-07-31T12:42:37+5:302023-07-31T12:43:58+5:30

जून व जुलै महिन्यात सुरुवातीला जशी गैरहजेरी लावली अगदी तशीच गैरहजेरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे.....

Cloudy weather for 2 days in Pune, but heavy rain at Ghat Matha pune rain update | वरुणराजा जाणार सुट्टीवर! पुण्यात २ दिवस ढगाळ वातावरण, घाट माथ्यावर मात्र मुसळधार

वरुणराजा जाणार सुट्टीवर! पुण्यात २ दिवस ढगाळ वातावरण, घाट माथ्यावर मात्र मुसळधार

googlenewsNext

पुणे : यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली असली तरी पावसाची सरासरी चांगली गाठली गेली आहे. विशेषतः पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात तो बसरला आहे. त्यामुळे पुणेकरांची पाणीकपात रद्द झाली. गेल्या काही दिवसांपासून वरुणराजा संततधारेने येत होता. आता ऑगस्ट महिन्यात मात्र तो सुटीवर जाणार आहे, तसा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. जून व जुलै महिन्यात सुरुवातीला जशी गैरहजेरी लावली अगदी तशीच गैरहजेरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे.

मोसमी वाऱ्यांचा पश्चिम-पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. दक्षिण छत्तीसगडावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. वातावरणाच्या वरच्या थरात दोन विरुध्द दिशेने जाणाऱ्या वाऱ्याच्या मधील क्षेत्र दक्षिणेकडे सरकले आहे. ही स्थिती राज्यात मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल आहे. त्यामुळे दोन दिवसांमध्ये घाटमाथ्यावर चांगला पाऊस होणार आहे. पुणे शहरात मात्र हलक्या सरी कोसळतील. त्यानंतर १ ऑगस्टनंतर वरुणराजाची गैरहजेरी असणार आहे.

सध्या एल-निनो सक्रिय झालेला असला तरी त्याचा पावसावर काहीही परिणाम होणार नाही, असे हवामान खात्याने सांगितले आहे. येत्या दोन तीन दिवसांमध्ये पुणे शहर व परिसरात दिवसा आकाश ढगाळ राहणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शहरातील पाऊस

शिवाजीनगर ०.६ मिमी

पाषाण ०.३ मिमी

लोहगाव : ०.४ मिमी

Web Title: Cloudy weather for 2 days in Pune, but heavy rain at Ghat Matha pune rain update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.