ढगाळ हवामानामुळे गुलछडीचे उत्पादन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:25+5:302021-06-28T04:08:25+5:30
पुणे : ढगाळ वातावरणामुळे गुलछडीच्या उत्पादनात घट झाली आहे. फुलबाजारात गुलछडीची आवक मंदावली आहे. संकष्टी चतुर्थीमुळे गेल्या दोन ...
पुणे : ढगाळ वातावरणामुळे गुलछडीच्या उत्पादनात घट झाली आहे. फुलबाजारात गुलछडीची आवक मंदावली आहे. संकष्टी चतुर्थीमुळे गेल्या दोन दिवसांपासून मागणी वाढल्याने गुलछडीच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
फुलबाजारात पावसामुळे ओली फुले दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. सर्व प्रकारच्या फुलांची साधारण आवक आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर टिकून आहेत.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : ५०-८०, अष्टर : जुडी १०-२५, सुट्टा ८०-१२०, कापरी : २०-४०, शेवंती : ६०-८०,(गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, जर्बेरा : ३०-५०, कार्नेशियन : ८०-१३०, शेवंती काडी १००-१५०, लिलियम (१० काड्या) ६००-८००, ऑर्चिड १००-२००, ग्लडिओ (१० काड्या) : ३०-४०, मोगरा २००-२५०.