सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी, निधनाची बातमी ऐकून मन सुन्न- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 12:22 PM2023-01-03T12:22:42+5:302023-01-03T12:22:54+5:30
लक्ष्मण जगताप भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते...
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटूंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते. मतदारांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली.
पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) यांचे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या जाण्याने पुणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. ते आजारी असतानादेखील विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी व्हिलचेअरवर आले होते. अशा निष्ठावंत आमदाराचे दुखःद निधन झाले आहे. एक आदर्श असा लोकप्रतिनिधी हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ मिळो, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले.मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटूंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 3, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली-
#Live Now https://t.co/V9VGiZdBCu
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 3, 2023