मुख्यमंत्र्यांनी केली मिसिंग लिंक बोगद्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:30 AM2020-12-11T04:30:05+5:302020-12-11T04:30:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ...

CM inspects Missing Link tunnel | मुख्यमंत्र्यांनी केली मिसिंग लिंक बोगद्याची पाहणी

मुख्यमंत्र्यांनी केली मिसिंग लिंक बोगद्याची पाहणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सादरीकरणाद्वारे सुरू असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली.

नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी खोपोली ते कुसगाव नवीन मार्गिकेच्या बांधकामाची माहिती दिली. कुसगाव ते खोपोली बाह्यवळण दरम्यान १३.३० किमी अंतराचा मिसिंग लिंग प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे. सुमारे दोन किमी अंतरापर्यंत बोगद्याचे काम झाले आहे. सदरचा प्रकल्प डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.

---------------------------------------------------------

कुसगाव ते खोपोली दरम्यान होत असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याच्या कामाची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवर.

Web Title: CM inspects Missing Link tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.