मुख्यमंत्री ठाकरे यांचा डॉक्टरांशी संवाद; नायडू रुग्णालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 12:16 AM2020-03-30T00:16:03+5:302020-03-30T06:28:19+5:30
डॉ. नायडू रूग्णालय सध्या कोरोना रूग्णांचे केंद्रबिंदू झाले आहे.
पुणे : मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी रविवारी कोरोना रूग्णांवर ऊपचार करणाऱ्या नायडू रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांबरोबर संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तसेच सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे आहे, असा दिलासाही दिला.
डॉ. नायडू रूग्णालय सध्या कोरोना रूग्णांचे केंद्रबिंदू झाले आहे. तिथे ससून, बी. जे. मेडिकल तसेच अन्यही काही विशेष शाखांचे अभ्यासक डॉक्टर रोज असतात. त्यांच्यापैकी थेट रूग्णांवर ऊपचार करणारे डॉक्टर व परिचारिका यांच्याबरोबर ठाकरे यांनी संवाद साधला.
देशातील जनतेला तसेच एकूणच वैद्यकीय क्षेत्राला अभिमान वाटावा असे काम तुम्ही करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या या संवादामुळे आपल्या कामाची दखल घेतली जात आहे, कोणीतरी आपलीही काळजी घेत आहे याचे समाधान मिळाले असल्याची भावना या संवादात सहभागी झालेल्यांनी व्यक्त केली.