सीएमए, पीवायसी विजयी

By admin | Published: May 12, 2017 05:08 AM2017-05-12T05:08:44+5:302017-05-12T05:08:44+5:30

पीवायसी, पुष्प क्रिकेट अ‍ॅकॅडमी, सीएमए आणि एच. के. बाऊन्स संघाने व्हेरॉक चषक १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी विजय मिळविले.

CMA, PYC won | सीएमए, पीवायसी विजयी

सीएमए, पीवायसी विजयी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पीवायसी, पुष्प क्रिकेट अ‍ॅकॅडमी, सीएमए आणि एच. के. बाऊन्स संघाने व्हेरॉक चषक १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी विजय मिळविले. पुष्पच्या सम्यक शहाचे धडाकेबाज नाबाद शतक दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
पीसीएमसीज् व्हेरॉक-वेंगरसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या वतीने थेरगाव येथील मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. सामनावीर सम्यक शहाच्या ६० चेंडूतील नाबाद १४६ धावांमुळे प्रथम फलंदाजी करताना पुष्प अ‍ॅकॅडमीने २५ षटकांत ९ बाद २६४ अशी भक्कम धावसंख्या उभारली. सम्यकला तनिश गांधीने ७१ धावा करीत चांगली साथ दिली. देवधर ट्रस्टला हे मोठे आव्हान पेलवता आले नाही. त्यांचा डावा २२.५ षटकांत १२४ धावांत आटोपल्याने त्यांना १४० धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. त्यांच्या वरद रावने सर्वाधिक ३८ धावा केल्या. पुष्पकडून हरजस कोहली (४/१६) आणि समिर ताहा ( ३/१६) यांनी देवधर ट्रस्टला गुंडाळले.
एच. के. बाऊन्सने पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेवर (पीडीसीए) सहा गडी राखून विजय मिळविला. पीडीसीएने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४० धावा केल्या. त्यांच्या प्रतीक शेलार (५५) आणि वरुण चौधरी (३०) यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. एच. के. कडून अवनीश गायकवाड आणि दिग्विजय पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. एच. के. बाऊन्सने २३.१ षटकात ४ बाद १४१ धावा करीत विजय मिळविला. त्यांच्या आर्शिन कुलकर्णी (नाबाद ४४), दिग्विजय पाटील ( ३८) आणि वेदांत जगदाळे (३१) विजयी लक्ष्य गाठण्यात महत्त्वाचे योगदान दिले. एचकेचा अष्टपैैलू दिग्विजय पाटील सामनावीर ठरला.
सीएमए संघाने पुष्प क्रिकेट अ‍ॅकॅडमी (सोलापूर) संघावर २३ धावांनी मात केली. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १४३ धावा केल्या. त्यांच्या साहिल अभंगने नाबाद ४३ आणि गौरव गोगावलेने २३ धावा केल्या. पुष्प अ‍ॅकॅडमीला २३.१ षटकात १२१ धावापर्यंतच मजल मारता आली. त्यांच्या सम्यक शहाने ३५, संंकेत काखांडीने २२ आणि तनिश गांधीने २१ धावा केल्या. सीएमएकडून सामनावीर विक्रांत कुलकर्णीने २८ धावांत चार, ऋग्वेद वडनेरकरने ८ धावांत तीन आणि गौरव गोगावलेने ११ धावांत दोन बळी घेतले.
पीवायसी : २५ षटकात ६ बाद १५५ ( अनिष जगताप ६३, मिहिर देशमुख ४४, साईराज चोपडे १६, सुचेत रात्रा ३//३८, कमल शर्मा २/३३) वि.वि. प्राधिकरण जिमखाना : १४.१ षटकात २४ ( आर्यन परदेशी ९, साईराज चोरगे ३/८).
पुष्प क्रिकेट अ‍ॅकॅडमी : ९ बाद २६४ ( सम्यक शहा १४६, तनिश गांधी ७१, अमोघ कुलकर्णी २/४०,वरद राव २/५७.) वि.वि. देवधर ट्रस्ट : १२४ ( वरद राव ३८, हरजस कोहली ४/१६, समिर ताहा ३/१६) पीडीसीए : ८ बाद १४० ( प्रतिक शेलार ५५, वरुण चौधरी ३०, दिग्विजय पाटील ३/१८) पराभूत वि. एच.के. बाऊन्स : २३.१ षटकात ४ बाद १४१ ( आर्शिन कुलकर्णी नाबाद ४४, दिग्विजय पाटील ३८) सीएमए : ५ बाद १४३ (साहिल अभंग नाबाद ४३, समिर ताहा २/२५, वि.वि. पुष्प क्रिकेट अ‍ॅकॅडमी : १२१ (संकेत काखांडी २२, तनिश गांधी २१, विक्रांत कुलकर्णी ४/२८,ऋग्वेद वडनेरकर ३/८)

Web Title: CMA, PYC won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.