सीएनजीच्या दरात दीड रुपयाने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 12:12 PM2019-04-05T12:12:22+5:302019-04-05T12:14:22+5:30

शहरामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)च्या माध्यमातून सीएनजी व पीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो.

CNG cost increased by one and a half rupees | सीएनजीच्या दरात दीड रुपयाने वाढ

सीएनजीच्या दरात दीड रुपयाने वाढ

Next
ठळक मुद्देकाही वर्षांत सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ

पुणे : वाहनांमध्ये वापरासाठीचा सीएनजी व घरगुती वापरासाठीचा पीएनजी गॅस गुरूवार (दि. ४) पासून दीड रुपयाने महागला आहे. त्यामुळे शहरातील ग्राहकांना सुधारीत दरानुसार सीएनजी ५६ रुपये ५० पैसे आणि पीएनजी ३० रुपये ५० पैसे या दराने खरेदी करावा लागत आहे. 
शहरामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)च्या माध्यमातून सीएनजी व पीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो. मागील काही वर्षांत सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच घरगुती वापरासाठीही पीएनजीचा वापर वाढला आहे. त्यामुळे कंपनीकडे मागणीत वाढ होत चालली आहे. गॅस पुरवठ्याच्या दरात १० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने गॅसचे दरही वाढविण्यात आले आहे. यापुर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये गॅसच्या दरात वाढ झाली होती. वाढीव दरानुसार सीएनजीचा दर ५५  रुपयांवरून ५६.५० रुपये तर पीएनजीचा दर २९ रुपयांवरून ३०.५० रुपयांवर गेला आहे. 
शहरामध्ये जवळपास पावणे दोन लाख वाहने सीएनजीवर धावतात. त्यामध्ये रिक्षा, कॅब, खासगी वाहनांचा समावेश आहे. तसेच लाखो ग्राहकांना पीएनजीचा पुरवठा केला जातो. दरवाढ झाल्याने ग्राहकांवरील आर्थिक ताण वाढणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या जवळपास निम्म्या बस सीएनजीवर धावतात. त्यामुळे ह्यपीएमपीह्णच्या खर्चातही भर पडणार आहे. 

Web Title: CNG cost increased by one and a half rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.