पुण्यात 'या' दिवशी CNG पंप राहणार बंद; सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
By नितीश गोवंडे | Updated: September 21, 2022 16:46 IST2022-09-21T16:42:36+5:302022-09-21T16:46:05+5:30
पुणे शहरात ६० पेक्षा अधिक सीएनजी पंप कार्यरत आहेत...

पुण्यात 'या' दिवशी CNG पंप राहणार बंद; सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
पुणे : पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार सीएनजीच्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी, या मागणीसाठी शहरातील सीएनजी पंप १ ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीवर मात्र मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुणे शहरात ६० पेक्षा अधिक सीएनजी पंप कार्यरत आहेत. असंख्य चारचाकी वाहनांसह हजारो रिक्षा आणि पीएमपी बसदेखील सीएनजीवर दररोज प्रवासी सेवा देतात.
पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे टॉरेंट गॅस पंपावर १ ऑक्टोबर रोजी सीएनजी विक्री होणार नसल्याची माहिती देण्यात आली. पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार सीएनजीच्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी, या प्रमुख मागणीसाठी हा बंद पुकारण्यात येणार आहे. असोसिएशनच्या या निर्णयामुळे पुणेकरांची मात्र मोठी गैरसोय होणार यात शंका नाही.