शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्यांना सहकार्य

By admin | Published: May 30, 2017 02:01 AM2017-05-30T02:01:17+5:302017-05-30T02:01:17+5:30

सामाजिक बांधिलकी जपणारी व शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणारी कॅप्चर सोलर एनर्जी कंपनी आहे. मदनवाडी भागातील शेतकरी कंपनीच्या

Co-operation with the interests of farmers | शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्यांना सहकार्य

शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्यांना सहकार्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : सामाजिक बांधिलकी जपणारी व शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणारी कॅप्चर सोलर एनर्जी कंपनी आहे. मदनवाडी भागातील शेतकरी कंपनीच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्या सोबत असतील. तसेच शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या कंपनीला सहकार्य करू, असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
मदनवाडी येथील डोंगर माथ्यावर कॅप्चर सोलर एनर्जी कंपनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भाडेतत्त्वाने घेऊन १५९ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारत आहे. त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भरणे यांच्या हस्ते झाला. कंपनीने स्वत:च्या नफ्यात वाढ करीत असताना जमिनीचा मालक असणारा शेतकरी अडचणीत येऊ नये, याची काळजी घ्यावी. तसेच मदनवाडी गावाला या प्रकल्पातून तयार होणारी वीज मोफत मिळावी. शेतकऱ्यांच्या मुलांना या प्रकल्पात नोकरी द्यावी, अशी मागणी भरणे यांनी केली. जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी उशिरा पोहोचत प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. प्रकल्पाचे चेअरमन राजू भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, मारुतराव वणवे, मनसेचे सुधीर पाटसकर, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, संजय देहाडे, सरपंच सारिका बंडगर, आबासाहेब देवकाते, प्रमोद नरुटे, शरद चितारे, संपत बंडगर उपस्थित होते. गावातील तरुणांना या प्रकल्पात सामावून घेऊ, तर हा प्रकल्प १८ महिने मुदतीत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भरणे यांच्या हस्ते कंपनीचे चेअरमन राजू भोसले यांची तीन देशांचे राजदूत झाल्याबद्दल सत्कार केला. राजेंद्र बलीनवर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डी. के. भोसले यांनी आभार केले.

Web Title: Co-operation with the interests of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.