पुरंदर हवेलीत होणार सहकारी रुग्णालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:11 AM2021-09-19T04:11:35+5:302021-09-19T04:11:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी : पुरंदर तालुक्यातील सासवड येथे १८० खाटांचे, तर हवेलीत ३५० खाटांचे सहकारी तत्त्वावरील अद्ययावत ...

Co-operative hospitals will be set up in Purandar Haveli | पुरंदर हवेलीत होणार सहकारी रुग्णालये

पुरंदर हवेलीत होणार सहकारी रुग्णालये

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील सासवड येथे १८० खाटांचे, तर हवेलीत ३५० खाटांचे सहकारी तत्त्वावरील अद्ययावत अशी आनंदी मल्टीस्पेशालिटी सहकारी रुग्णालयाची उभारणी लवकरच होत असल्याची माहिती रुग्णालयाचे मुख्य प्रवर्तक आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

गेल्या दोन वर्षांत कोरोनाकाळात सर्वसामान्य नागरिक होरपळले. यामुळे सहकारी तत्त्वावर चालवण्यात येणारे रुग्णालय उभारण्याची तयारी काही डॉक्टर सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जगताप यांनी सुरू केली होती. शुक्रवारी (दि.१७) राज्याच्या सहकार, पणन विभागाने या रुग्णालयाच्या उभारणीस परवानगी दिली. तसे अधिकृत रजिस्ट्रेशनही झालेले आहे. येत्या १५ दिवसांत सासवड येथे आणि हवेलीतील फुरसुंगी, उंड्री-पिसोळी या परिसरात रुग्णालयाची उभारणी सुरू केली जाणार आहे.

रुग्णालयाच्या उभारणीसाठी सुरुवातीला ५०० सभासदांची नोंदणी झाली आहे. सुमारे २३ लक्ष ८० हजार एवढे भाग भांडवल ही जमा झालेले आहे. सभासद नोंदणी ही सुरू करण्यात आलेली आहे. सभासद नोंदणी आवश्यक असून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून सभासदांना सवलतीच्या दरात आरोग्यासाठीचे सर्वतोपरी लाभ दिले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

यावेळी ग्रामीण स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनीताई जगताप, या रुग्णालयाचे उपप्रवर्तक दीपक जगताप, संचालक डॉ. प्रवीण जगताप, डॉ.अजित साबळे, डॉ.सुमित काकडे, डॉ.रवींद्र कुंभार, डॉ.संदीप होले, डॉ.सचिन निरगुडे, डॉ.विनायक खाडे, डॉ.प्राजक्ता दुर्गाडे, डॉ.सुनील बांदल, डॉ.वृषाली मासाळ, डॉ.आरती निगडे, योगिता झांबरे, अनिल उरवणे, गुलाबराव गायकवाड आदी उपस्थित होते.

चौकट

सर्वसामान्यांच्या जीवनाशी अत्यंत निगडित असा आरोग्याचा प्रश्न आहे. सहकार महर्षी चंदूकाका जगताप यांनी सहकारात मोठे योगदान दिले आहे. पतसंस्था, बँक, दुग्धव्यवसाय यासारखे अनेक विधायक उपक्रम त्यांनी सहकारी तत्त्वावर उभारले. ते यशस्वीही झाले आहेत. मात्र, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात लोकोपयोगी सुविधेचा पाया रचण्याचा आमचा वेगळा प्रयोग असणार आहे. सहकारी तत्त्वावर चालणारी राज्यातील पहिलीच आरोग्य संस्था आम्ही उभारत असून तो एक वेगळा उपक्रम असेल. या सहकारी रुग्णालयाचे समभाग संस्था कार्यालयात उपलब्ध असून त्याचा भरणा करून सदस्य होता येणार आहे. अद्ययावत सोयी-सुविधांनीयुक्त अशी ही दोन ठिकाणी रुग्णालये उभी होणार आहेतच, मात्र भविष्यात इतरत्र ही रुग्णालयांची शृंखला विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे ही त्यांनी सांगितले.

फोटो : सहकारी रुग्णालयाची घोषणा करताना आमदार संजय जगताप व इतर.

180921\img_20210918_122313.jpg

सहकारी रुग्णालय उभारण्याची घोषणा करताना आ संजय जगताप

Web Title: Co-operative hospitals will be set up in Purandar Haveli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.