शब्दब्रह्म अन‌् नादब्रह्मचा प्रा.जोशी यांच्या वक्तृत्वात संयोग : डॉ. राजा दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:14+5:302021-07-24T04:08:14+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या व्य़ाख्यान प्रवासाच्या राैप्यमहोत्सवानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठान आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था यांच्या संयुक्त ...

Coincidence in the rhetoric of Prof. Joshi King Dixit | शब्दब्रह्म अन‌् नादब्रह्मचा प्रा.जोशी यांच्या वक्तृत्वात संयोग : डॉ. राजा दीक्षित

शब्दब्रह्म अन‌् नादब्रह्मचा प्रा.जोशी यांच्या वक्तृत्वात संयोग : डॉ. राजा दीक्षित

googlenewsNext

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या व्य़ाख्यान प्रवासाच्या राैप्यमहोत्सवानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठान आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. राजा दीक्षित यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, ''प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांच्या वक्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अनेक वक्ते शैलीच्या आहारी गेल्यामुळे बोलण्यात गुंगवतात. परंतु, व्याख्यानानंतर ते नक्की काय बोलले हा प्रश्न पडतो. मिलिंद जोशीच्या वक्तृत्वात आशय आणि शैलीचा संगम आहे.''

प्रा.जोशी म्हणाले, ''माझ्या आई वडिलांनी मला प्रोत्साहन दिले. प्राचार्य शिवाजीराव भोसले भेटले नसते तर मी वक्ता झालो नसतो.''

Web Title: Coincidence in the rhetoric of Prof. Joshi King Dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.