केडगावला जोपासला नाणी, नोटांचा छंद
By admin | Published: January 13, 2017 01:53 AM2017-01-13T01:53:20+5:302017-01-13T01:53:20+5:30
येथील सेवानिवृत्त रेल्वे स्टेशन मास्तर रशिद शेख यांनी देशी-विदेशी नाणी व चलनी नोटांचे
केडगाव : येथील सेवानिवृत्त रेल्वे स्टेशन मास्तर रशिद शेख यांनी देशी-विदेशी नाणी व चलनी नोटांचे प्रदर्शन भरवून अनोखा छंद जोपासला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. भारत खळदकर यांनी केले.
या वेळी मनोज निंबाळकर, डॉ. शिंदे, डॉ. देशमुख, संजय गरदडे, चंद्रकांत पिसे, जितेंद्र जाधव उपस्थित होते. रशिद शेख यांनी वयाच्या १३व्या वर्षापासून म्हणजे १९४७ पासून हा छंद जोपासला आहे.
रशिद शेख यांचे वडील हैदराबाद येथे नोकरीला असताना शेख यांना देशी, विदेशी नाणी व नोटांचे आकर्षण वाटायचे. किराणा मालाच्या दुकानातून त्यांनी सुट्टे पैशांच्या बदल्यात नाणी जमा केली.
याशिवाय अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, रशिया, पोलंड, युगोस्लोव्हिया, आॅस्ट्रेलिया, फिनलंड, मेक्सिको, तुर्की, दक्षिण आफ्रिका, युगांडा, भुतान, केनया, टांझानिया, सौदी अरेबिया, कुवेत, दुबई, न्यूझीलंड, इजिप्त, जॉर्डन, गोवा, पोर्तुगीज आदी ४0 देशांतील नाणी व पोस्टकार्ड या प्रदर्शनात मांडले होते. प्रदर्शनासाठी अबुबकर, वाल्हेकर यांचे सहकार्य लाभले. या छंदाविषयी रशिद शेख म्हणाले की, बालपणी चिकित्सक वृत्ती, कुतूहल या गुणांमुळे प्रतिकूल परिस्थितीत मी हा छंद जोपासला. बऱ्याचदा पगारातील बराचसा खर्च छंदावर खर्च व्हायचा. परंतु कुटुंबीयांच्या सहकार्यामुळेच मी हा छंद जोपासू शकलो. (वार्ताहर)
१९५४ मध्ये भारतीय रेल्वेत रुजू झाल्यावर त्यांनी कुर्डुर्वाडी, दौंड, पांगारी, पंढरपूर येथे नोकरी करताना आपल्या छंदामध्ये खंड पडू दिला नाही. त्यांना वेगळे नाणे, नोटा दिसल्या की लगेच खरेदी करायचे. प्रदर्शनात शिवाजी महाराज, अलेक्झांडर, तुघलकी, सातवाहन, मध्ययुगीन, समुद्रगुप्त, आदिलशहा, बहामणी, यशवंतराव होळकर, शहाजहान, औरंगजेब, ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील सर्व नाणी त्यांच्याकडे संग्रहित आहेत.