आळंदीकरांना कोरोना लस मोफत द्यावी : गिलबिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:11 AM2021-03-14T04:11:19+5:302021-03-14T04:11:19+5:30
यासंदर्भात, सभापती गिलबिले यांनी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, या महामारीत ...
यासंदर्भात, सभापती गिलबिले यांनी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, या महामारीत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला राेखण्यासाठी लस तयार करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही लस नागरिकांना दिली जात आहे.
पहिल्या टप्प्यात ही लस कोरोना योद्धयांना मोफत देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक यांना लस दिली जात आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली असून, त्याची तयारी ही प्रशासकीय स्तरावर झाली आहे. त्या अनुषंगाने आळंदी नगर परिषदेकडून सर्वसामान्य नागरिकांना कोरोना लस मोफत देण्याची गरज आहे. कोरोना लसीपासून एकही व्यक्ती वंचित राहता कामा नये. तसेच कोरोना लसीचा भुर्दंड पडू नये म्हणून आळंदी नगर परिषद प्राप्त यात्रा कर अनुदानाच्या रकमेवर जमा झालेल्या व्याजाच्या रकमेतून नागरिकांना लस उपब्ध करून द्यावी, अशी मागणीही गिलबिले यांनी केली आहे.