Health News: सकाळी थंडी अन् रात्री उकाडा; सर्वसामान्यांच्या आरोग्यवर होतायेत दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 01:15 PM2023-02-12T13:15:51+5:302023-02-12T13:16:11+5:30

कणकणी येणे, ताप येणे, खाेकला येणे, अंगदुखी, डाेकेदुखी, घसादुखी या लक्षणांनी नागरिक हैराण

Cold in the morning and hot at night There are side effects on the health of common people | Health News: सकाळी थंडी अन् रात्री उकाडा; सर्वसामान्यांच्या आरोग्यवर होतायेत दुष्परिणाम

Health News: सकाळी थंडी अन् रात्री उकाडा; सर्वसामान्यांच्या आरोग्यवर होतायेत दुष्परिणाम

Next

पुणे : रात्रीच्या वेळी उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवताे, तर सकाळच्या वेळी स्वेटर घातल्याशिवाय बाहेर पडू नये इतकी अंगाला झाेंबणारी थंडी असते. या बदलणाऱ्या वातावरणाचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. तापमानात अचानक होणाऱ्या परस्परविराेधी फरकामुळे वातावरणात विषाणूंची संख्या वाढत आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशा विषाणूजन्य आजारांनी (व्हायरल फीव्हर) लहानांपासून माेठे बेजार झाले आहेत.

या आठवड्यात शहरातील तापमान सारखे बदलत आहे. तापमानात होणारा तीव्र चढ-उतार यामुळे वातावरण बदललेले आहे. जेव्हा असे परस्परविराेधी हवामान बदलते, तेव्हा वातावरणात विषाणू, जिवाणूंची संख्या वाढते. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेले लहान व माेठे व्यक्ती आजारी पडतात. यामध्ये कणकणी येणे, ताप येणे, खाेकला येणे, अंगदुखी, डाेकेदुखी, घसादुखी या लक्षणांनी नागरिक हैराण झाले आहेत. तसेच उपचारासाठी ते सरकारी रुग्णालये, तसेच खासगी दवाखान्यांतही गर्दी करत आहेत.

शहरात भागानुसारही तापमानात तफावत

पुणे शहरात व उपनगरांत वेगवेगळ्या ठिकाणी तापमानाची प्रचंड तफावत जाणवत आहे. शिवाजीनगर आणि हडपसर या दाेन्हीमधील तापमानातही खूप फरक आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी शिवाजीनगरचे किमान तापमान अवघे ११.५ अंश सेल्सिअस हाेते. त्याच वेळी हडपसरचे १९.५ अंश सेल्सिअस नाेंदवले गेले. तर लवळेला २२.५ इतके तापमान नाेंदवले गेले. याच ठिकाणांवरील शनिवारी दुपारचे कमाल तापमान हे शिवाजीनगर ३३.८ अंश सेल्सिअस, हडपसर ३५.३ आणि लवळे ३७.७ इतके नाेंदवले गेले. याचाच परिणाम आजारी पडण्यावर हाेताे.

मास्क वापरा

मास्क हा अनेक आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त आहे. व्हायरल फीव्हर असलेली व्यक्ती मास्क वापरत असेल तर आजाराचा प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त आहे. आजारी व्यक्तीच्या तोंडावाटे संसर्ग हाेण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे.

काय काळजी घ्याल?

- ज्यांना आधीच श्वसननलिकेच्या संसर्गाचा त्रास आहे, त्यांनी डाॅक्टरांना दाखवावे.
- ज्यांना याबाबतची आधीच औषधे सुरू आहेत, त्यांनीही त्या औषधांमध्ये काही बदल करायचे असतील, तर डाॅक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावेत.
- मास्कचा वापर करावा.
- भाज्या, फळे धुऊन घ्याव्यात. पाणी उकळून पिणे, मास्क वापरणे, गर्दीत जाणे टाळणे, बाहेरचे खाणे टाळावे.
- त्वचेच्या समस्यांसाठी त्वचाविकार तज्ज्ञांना दाखवा.
- त्वचेसाठी याेग्य ते मॉइश्चरायझरचा वापर करावा.
- ड्रायनेसचा परिणाम पचनावर हाेताे, त्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवायला हवे.

त्वचेच्या समस्यांचे प्रमाण वाढले

बदललेल्या हवामानामुळे रुग्णांमध्ये अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक व्हायरल इन्फेक्शन वाढले आहे. याला कुठलाही वयाेगट अपवाद नाही. त्यामध्ये धूर, धूळ, वायुप्रदूषण भर घालत आहे. ज्यांना रेस्पिरेटरी सिंड्राेम जसे दमा, न्युमाेनिया, ब्राँकायटिस आहे, त्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. हवामानातील बदलामुळे वातावरणात ‘व्हायरल लोड’ वाढलेला आहे. त्यामुळे साधा खोकला, सर्दी यासह न्युमोनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे त्वचेच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. त्वचा काेरडी पडते, असेही दिसून येत आहे. - डॉ.भारत कदम, कार्यकारी सदस्य, पुणे डॉक्टर असोसिएशन.

Web Title: Cold in the morning and hot at night There are side effects on the health of common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.