दिवसा उकाडा रात्री थंडी
By admin | Published: October 10, 2016 01:54 AM2016-10-10T01:54:49+5:302016-10-10T01:54:49+5:30
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दिवसा उकाडा जाणवू लागला असून, रात्री थंडी वाजावी इतका गारवा वातावरणात असून, मधूनच आलेल्या एखाद्या सरीने
Next
पुणे : पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दिवसा उकाडा जाणवू लागला असून, रात्री थंडी वाजावी इतका गारवा वातावरणात असून, मधूनच आलेल्या एखाद्या सरीने एकाच दिवसात तिन्ही ऋतूंचा अनुभव सध्या पुणेकरांना येत आहे़ रविवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद लोहगाव
येथे ३५़७ अंश सेल्सिअसइतकी नोंदविली गेली़
राज्यात गेल्या २४ तासांत शिरपूर १७०, देवडी, हिंगोली १००, धर्माबाद ७०, देगलूर ६०, सिल्लोड, नांदेड, परभणी, कळमनुरी ५०, शहादा, हादगाव, नायगाव, निलंगा, पूर्णा
४० मिमी पावसाची नोंद झाली
होती़ रविवारी दिवसभरात महाबळेश्वर ३, रत्नागिरी ८८,
पणजी ७, चंद्रपूर ६ मिमी पाऊस झाला़ (प्रतिनिधी)