थंडीचा कडाका ओसरण्यास होणार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:10 AM2021-02-08T04:10:17+5:302021-02-08T04:10:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आग्नेय मध्य प्रदेश व लगतच्या भागापासून विदर्भापर्यंत कमी दाबाचे असलेले क्षेत्र शनिवारी विरून गेल्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आग्नेय मध्य प्रदेश व लगतच्या भागापासून विदर्भापर्यंत कमी दाबाचे असलेले क्षेत्र शनिवारी विरून गेल्यानंतर राज्यातील किमान तापमानात चांगलीच घट झाली होती. दोन दिवसांनंतर आता थंडीचा पारा सरासरीच्या जवळपास आहे. राज्यात नाशिक येथे सर्वात कमी किमान तापमान १० अंश सेल्सिअसन नोंदविले गेले आहे.
विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किंचित घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या बर्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
देशात पूर्व राजस्थानमधील सिकर येथे सर्वात कमी किमान तापमान ३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस तापमान सरासरीच्या जवळपास राहण्याची शक्यता असून त्यानंतर ते वाढत जाणार आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १०.८, लोहगाव १३.७, जळगाव १०.४, कोल्हापूर १८, महाबळेश्वर १३.६, मालेगाव ११.२, नाशिक १०, सांगली १६.३, सातारा १४.९, सोलापूर १६.२, मुंबई २२.२, सांताक्रुझ २, रत्नागिरी २०.८, पणजी २०.७, डहाणु १७.२, औरंगाबाद १२.५, परभणी १२.४, नांदेड १६, अकोला ११.३, अमरावती १३.४, बुलढाणा १४, बम्हपूरी १२.७, चंद्रपूर १२.८, गोंदिया १०.२, नागपूर १४.१, वाशिम १६, वर्धा १३.२.